hyderabad police arrested two boys clicking photo on bridge video viral 
देश

Video: महामार्गावर कपडे काढून काढत होते छायाचित्र अन्...

वृत्तसंस्था

हैदराबाद: महामार्गावर रात्रीच्या वेळी कपडे काढून छायाचित्र काढत असताना पोलिस आले आणि त्यांना ताब्यात घेतले. संबंधित कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हैदराबादमधील येथे तयार करण्यात आलेला दुरूगाम-छेरुवू द्रुतगती मार्गावर हा प्रकार घडला आहे. या महामार्गावर नागरिक थांबून सेल्फी घेत असतात. सध्या तो सेल्फी पॉइंट झाला असल्यामुळे पोलिसांना घटनास्थळी सीसीटीव्ही लावले आहेत. 1 ऑक्टोबर रोजी दोन मुले या पूलावर झोपून सेल्फी काढत होते. शिवाय, वेगवेगळ्या बाजूने फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. संबंधित प्रकार सीसीटीव्हीद्वारे पोलिसांनी पाहिला. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना ताब्यात घेतले.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक मुलगा झोपलेला असून, दुसरा मुलगा त्याचे फोटो काढत आहे. पोलिसांची अचानक गाडी आल्यानंतर त्यातील एक मुलगा पळून जाऊ लागला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. शिवाय, रस्त्यावर अशा प्रकारचे स्टंट करू नका म्हणून पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, नागरिक पूलावर थांबून छायाचित्रे काढताना दिसतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT