bandaru dattatreya 
देश

दहशतवादी कारवायांसाठी हैदराबाद सुरक्षित : भाजप खासदार

वृत्तसंस्था

हैदराबाद : हैदराबाद हे शहर दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित असल्याचे वक्तव्य भाजपचे खासदार बंडारू दत्तात्रेय यांनी केले. एनआयएनने आयसीसशी संबंधित असलेल्या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर दत्तात्रेय यांनी प्रतिक्रिया दिली. यासंबंधी त्यांनी राज्यसरकारवरही टीका केली. 

'राष्ट्रीय तपास पथकाने हैदराबादमध्ये नुकत्याच केलेल्या कारवाईवरून हे सिद्ध झाले आहे की, दहशतवादी कारवायांसाठी हैदराबाद हे सुरक्षित आणि पुरक ठिकाण आहे. येथे दहशतवाद्यांच्या संख्येत वाढ होत आहे, तसेच यापूर्वी दहशतवादी कारवायांसाठी हैदराबादमधून मोठ्य़ा प्रमाणात भरती करण्यात आली होती,' असे खा. दत्तात्रेय यांनी सांगितले.

या प्रकरणी योग्य कारवाई व्हावी व राज्यसरकारने याकडे लक्ष द्यावे, पोलिस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथके नेमावीत, अशी मागणी खासदार बंडारू दत्तात्रेय यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

 Kolhapur Corporation : ‘शड्डू’ घुमला, ‘ताळ’ सुटला; नवीन नगरसेवकांवरच ज्येष्ठांना सांभाळून घेण्याची वेळ

Education News: VIT ची दमदार कामगिरी; २०२६ बॅचसाठी १० हजारांहून अधिक प्लेसमेंट ऑफर्स

Navi Mumbai: शेकडो व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : हडपसरमध्ये वॉचमनला मारहाण; दारूच्या नशेत दोघांचा हल्ला

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

SCROLL FOR NEXT