Hyderabad-Traffic-Police 
देश

सलाम! अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून देण्यासाठी ट्राफीक पोलिस रस्त्यावर धावला; VIDEO VIRAL

वृत्तसंस्था

हैदराबाद - ट्राफीक पोलिस हा तसा एखाद्या चौकात किंवा रस्त्यावर वाहतूकीचं नियोजन करत असलेला माणूस. रस्त्यावर वाहतूक विस्कळीत होऊ नये आणि ट्राफीक जाम होऊ नये यासाठी कार्यरत असतात. आता अशाच एका ट्राफीक पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपलं कर्तव्य बजावत असलेल्या या ट्राफिक पोलिसावर कौतुकाचा व्रषाव केला जात आहे. हैदराबादमधील असलेल्या या व्हिडिओमध्ये ट्राफिक पोलिसाने एका अ‍ॅम्ब्युलन्सला गर्दीतून वाट करून दिल्याचं दिसतं. यासाठी पोलिस अॅम्ब्युलन्सच्या पुढे धावत जाऊन आडव्या असलेल्या गाड्यांना बाजूला होण्यासाठी विनंती करतो. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अबिड्स इथून कोटीला निघालेल्या अ‍ॅम्ब्युलन्समधील रुग्णाची परिस्थिती गंभीर होती. अ‍ॅम्ब्युलन्स जेव्हा ट्राफइकमध्ये अडकली तेव्हा वाहतूक नियंत्रण करणाऱ्या ट्राफिक पोलिसाने पुढे येत अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग करून दिला. यासाठी ट्राफिक पोलिस गाडीच्या पुढे धावत राहिला आणि वाटेत आडव्या असलेल्या गाडीचालकांना बाजूला होण्याची विनंती केली आणि अ‍ॅम्ब्युलन्ससाठी मार्ग मोकळा केला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या पोलिसाचे नाव बाबजी असल्याचे समजते. एक किलोमीटरहून अधिक अंतर त्याने अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून दिली असल्याचंही सांगण्यात येतं. सोमवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावरून या ट्राफिक पोलिसाच्या कामाचं कौतुक केलं जात आहे. अतिरिक्त आयुक्त अनिल कुमार यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यात पोलिसाचे कौतुक करताना त्यांनी म्हटलं की, हैदराबाद ट्राफिक पोलिस अधिकारी बाबजी अ‍ॅम्ब्युलन्ससाठी रस्ता रिकामा करताना. खूप छान. हैदराबाद ट्राफिक पोलिस नागरिकांच्या सेवेमध्ये अशा शब्दात त्यांनी ट्राफिक पोलिसाच्या कामाचं कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : राष्ट्रवादी अन् मविआ पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढणार? अजितदादांचा सतेज पाटील यांना फोन

हृदयद्रावक! भीषण अपघातात मामा-भाचीनंतर सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू; कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त

Latest Marathi News Live Update : नगराध्यक्ष होताच हातात झाडू घेऊन मैथिली तांबे उतरल्या थेट संगमनेरच्या रस्त्यावर

Kolhapur Flashback : रिक्षाचालकांचा घेराओ, सभात्याग आणि गुप्त खेळी; १९८० ची महापौर निवडणूक इतिहासजमा

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली ! सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT