UP Teacher Tripta Tyagi student Slap viral video communal in nature
लखनऊ- उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूरमधील शिक्षिकेकडून मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झालाय. अनेक राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. याप्रकरणात महिला शिक्षक तृप्ती त्यागी यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. मी दिव्यांग आहे, त्यामुळे मी उठून मुलाला मारु शकत नव्हते. त्यामुळे वर्गमित्रांना मुलाला मारायला सांगितलं, असं त्या म्हणाल्या.
तृप्ती त्यागी म्हणाल्या की, धार्मिक द्वेषातून हे केलेलं नाही. व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आली होती. मुलाचे वडील माझ्याकडे आले होते, त्यांनी मुलाला कडक शिक्षा करण्यासाठी सांगितलं होतं. जेणेकरुन तो अभ्यासाकडे लक्ष देईल. मी दिव्यांग आहे, त्यामुळे मी जागेवरुन उठून मारु शकत नव्हते. त्यामुळे त्याच्या वर्गमित्रांकडून हे काम करुन घेण्याच मी ठरवलं.
दोन महिन्यांपासून मॅथेमॅटिक टेबल तो करुन येत नव्हता. तो सुधारेल, अभ्यास करायला लागेल म्हणून त्याला ही शिक्षा देण्यात आली. विद्यार्थ्याने शिकावं हे शिक्षकांचं काम असतं.मोहम्मद हा शब्दच व्हिडिओमध्ये ठेवण्यात आला, पूर्ण वाक्य व्हिडिओमध्ये नव्हतं. मी म्हटलं होतं की, जितक्या मुस्लिम आई आहेत त्यांनी मुलांना मामाकडे घेऊन जाऊ नये, कारण त्यामुळे शिक्षणावर परिणाम होतो, असं त्या म्हणाल्या.
व्हिडिओ त्याच्या काकाने शूट केला आहे. माझा उद्देश हिंदू-मुस्लिम असा नव्हता. आमच्या गावात हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतात. मी या शाळेची मुख्याध्यापीका आहे. पण, मला या घटनेचा पश्चाताप आहे. हा व्हिडिओ देश पातळीवर घेऊन जाण्यात आला आहे. त्याचं दु:ख आहे. हे इतके मोठे प्रकरण नव्हते. पण, याला इतकं मोठं बनवण्यात आलं, असं त्या म्हणाल्या.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेवर पोस्ट केली. इतक्या मोठ्या नेत्याने-इतकी छोटी गोष्ट करायला नको होती. हे विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी नुकसानकारक आहे. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना कसं शिकवेल, अशा छोट्या-छोट्या गोष्टी व्हायरल होऊ लागल्या तर शिकवणं अवघड होऊन जाईल, असंही त्या म्हणाल्या.
मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्याला वर्गातील इतर वर्गमित्र एकानंतर एक असे चापट मारत आहेत. शिक्षिकाच विद्यार्थ्यांना असं करायला सांगत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला असून शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.