Rahul Gandhi Video esakal
देश

Rahul Gandhi Video : माझा गळा जरी कापला तरी... वरुण गांधींच्या प्रश्नावर राहुल गांधींचं रोखठोक उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या देशभर चर्चेत आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी भाजप आणि संघावर जोरदार हल्ला करीत आहेत. आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वरुण गांधी आणि संघाबद्दल राहुल गांधींनी रोखठोक मत मांडलं.

भारत जोडो यात्रेदरम्यान सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटीबद्दलही राहुल गांधींनी भाष्य केलं. वरुण गांधींच्या एका प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, माझी आणि त्यांची विचारधारा जुळत नाही. ते भाजपमध्ये आहेत. ते या यात्रेमध्ये चालू शकत नाहीत आणि मी आरएसएस कार्यालयात जावू शकत नाही तसं करायचं असेल तर त्याआधी माझा गळा कापावा लागेल. माझ्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. वरुणची विचारधारा वेगळी आहे, ती मी कधीही स्वीकारु शकत नाही.

हेही वाचाः भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

ते पुढे म्हणाले की, मी कुटुंब म्हणून त्यांना प्रेमाने भेटू शकतो. गळाभेटही घेईल, परंतु विचारधारा कधीही स्वीकारणार नाही. राहुल गांधी पंजाबमधील होशियारपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

यानंतर राहुल गांधींनी सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटीबद्दल खुलासा केला. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींची सुरक्षा भेदत एक व्यक्तीने राहुल गांधींची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला होता.

राहुल गांधी म्हणाले, की "सुरक्षेत कुठे चूक झाली? मला मिठी मारायला एक व्यक्ती येत असल्याचे मला दिसले होते. मात्र, यात कुठे चूक झाली हे मला कळत नाहीये.

या यात्रेत खूप उत्साह असतो संबंधित व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तपासले होते. गळाभेट घेणारी व्यक्ती उत्साहित झाली होती यात सुरक्षेत त्रुटी असल्याचे मला वाटत नाही. यात्रेत अशा प्रकारचे प्रसंग नियमित घडत असतात, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता, २० वर्षांनी निकाल

Amit Shah Kolhapur Speech : अमित शहांकडून कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला; एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट ‘शिवसेना प्रमुख’ म्हणून उल्लेख

पवनराजे निंबाळकर हत्याकांड! तपासातील त्रुटींवर कोर्टाचा कठोर आक्षेप; निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे पॉइंट टू पॉइंट

महाराष्ट्र जळतोय, राजकारणी फक्त फोडाफोडीत व्यस्त; ऑपरेशन टायगरवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, अमित शाहांच्या PM मिशनवर मोठा दावा

IND vs AFG 3rd ODI: हर्षित राणा बाकावर, KL Rahul ला विश्रांती अन्... भारतीय संघात ३ बदल; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT