Coronavirus File photo
देश

तिसरी लाट मुलांसाठी किती घातक? एम्सचे संचालक म्हणतात...

मुलांना धोक्याची शास्त्रीय माहिती नाही, कोरोना नियमांचे पालन आवश्‍यक : डॉ. रणदीप गुलेरिया

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

आपल्याला येणाऱ्या लाटा रोखायच्या असतील, तर कोरोना नियमाचे कसोशीने पालन आवश्यक आहे. बहुसंख्य लोकसंख्येचे लसीकरण झाले आणि प्रतिकारक्षमता वाढली की अशा लाटा थांबतील.

नवी दिल्ली : कोरोनाच्या येणाऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना होणार असल्याची माहिती चुकीची आहे. भारतच नव्हे; जगभरातही मुलांना धोका होण्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केली. दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद‌ साधला. ते म्हणाले, "कोरोनाचा संसर्ग ज्या मुलांना झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यातील ६० ते ७० टक्के मुलांना सहव्याधी होत्या. त्यांची प्रतिकार क्षमता देखील कमी होती. कोरोना प्रतिबंधक नियमांचे कसोशीने पालन यामुळेच कोरोनाला रोखता येणार आहे.’’ ()

हवेतून पसरणाऱ्या विषाणूंमुळे महामारीच्या काळात संसर्गाच्या लाटा येत असतात. कोविड हाही अशाचप्रकारचा विषाणू आहे. विषाणू संक्रमित लोकसंख्या वाढली की या लाटा वाढतात. परंतु लोकांमध्ये विषाणूला रोखण्याची प्रतिकारक्षमता निर्माण झाली की संसर्गाचे रुप हंगामी होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

विषाणूंमधील बदलांमुळेही संसर्गाची लाट येते. तसेच कधी मानवी वर्तनही त्यास कारणीभूत ठरते. संसर्गाचे प्रमाण वाढले की लोकांमध्ये‌ भीती निर्माण होते, प्रशासन हस्तक्षेप करते. संसर्गाचे प्रमाण कमी होते, व्यवहार सुरू होतात, त्यावेळी कोरोना विषयक नियमांचे पालन केले जात नाही. आता संसर्ग होणार नाही, असा लोकांचा समज होतो. लोक नियम पाळत नाही आणि पुन्हा संसर्गाचे प्रमाण वाढते. आपल्याला येणाऱ्या लाटा रोखायच्या असतील, तर कोरोना नियमाचे कसोशीने पालन आवश्यक आहे. बहुसंख्य लोकसंख्येचे लसीकरण झाले आणि प्रतिकारक्षमता वाढली की अशा लाटा थांबतील, असे गुलेरिया म्हणाले.

(Edited by : Ashish N. Kadam)

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT