I-T Refund Scam  
देश

I-T Refund Scam: हैदराबादमध्ये 40 कोटी रुपयांच्या आय-टी रिफंड घोटाळ्याचा पर्दाफाश!

Sandip Kapde

I-T Refund Scam : आयकर विभागाने 40 कोटी रुपयांच्या आय-टी रिफंड घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. आठ कर सल्लागार, रेल्वे आणि पोलीस विभागातील अनेक कर्मचारी तसेच हैदराबाद आणि विजयवाडा येथील आयटी कंपन्यांचा तपास सुरू आहे. आयटी तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी निझामपेट , एलबी नगर आणि वनस्थलीपुरममधील विविध ठिकाणी सर्वेक्षण केले .

वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले हा घोटाळा मोठ्या प्रमाणात असू शकतो, असा संशय आहे. या फसवणुकीच्या कृत्यांमध्ये गुंतलेल्या अधिकाधिक सल्लागार आणि कर्मचार्‍यांचा शोध घेण्यासाठी पुढील काही दिवसांत तपास सुरू राहील.

"कर्मचारी पात्र नसतानाही सल्लागार बोगस कागदपत्रे बनवतात किंवा कलम 80CC आणि 80DD अंतर्गत योग्य कागदपत्रांशिवाय रिटर्न फाइल करतात. प्रत्येक सल्लागाराने अंदाजे 500 ते 1,000 अशा आयटी दाखल केल्या होत्या," असे आयटी विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.  

एका वरिष्ठ आयटी अधिकाऱ्याने सांगितले की, सल्लागारांनी थेट किंवा त्यांच्या एजंटांमार्फत, परताव्याच्या रकमेवर 10% कमिशनसाठी त्यांचे रिटर्न भरण्याची ऑफर देणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. काही कर्मचार्‍यांना ही फसवी योजना असल्याची माहिती नव्हती आणि त्यांनी त्यांच्या खात्यात कमिशनसाठी परतावा मिळविण्यासाठी त्यांची ओळखपत्रे स्वेच्छेने प्रदान केली.

अशा प्रकारचा फसवणुकीचा प्रकार उघडकीस येण्याची ही पहिलीच घटना नाही. 2017 मध्ये, आयटी विभागाला आढळून आले की 200 सॉफ्टवेअर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमधील अपंगत्व आणि दीर्घकालीन आजारांचा खोटा दावा करून परतावा मागितला होता.

हैदराबाद केंद्रीय गुन्हे शाखेने तपास केला आणि त्यात सहभागी सल्लागार आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. दाखल केलेल्या आरोपांमध्ये दोन कर सल्लागारांविरुद्ध आयपीसीच्या कलम 420 आणि 406 यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT