Naresh Goyal: Esakal
देश

Naresh Goyal: “…असं जगण्यापेक्षा मरण येऊ दे”, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी कोर्टात असं का म्हटलं?

Naresh Goyal: ७४ वर्षीय नरेश गोयल यांना काल म्हणजेच शनिवारी पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. त्याची प्रकृती खूपच वाईट दिसत होती. त्यावेळी न्यायाधीशांसमोर बोलताना ते म्हणाले, "त्यांनी आयुष्याची प्रत्येक आशा गमावली आहे".

अंकिता खाणे (Ankita Khane)

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. कॅनरा बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीने १ सप्टेंबरला नरेश गोयल यांना अटक केली होती. ७४ वर्षीय नरेश गोयल यांना काल म्हणजेच शनिवारी पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. त्याची प्रकृती खूपच वाईट दिसत होती. यावेळी बोलताना ते म्हणाले“जीवनाची प्रत्येक आशा संपली आहे, सध्याच्या स्थितीत जगण्यापेक्षा तुरुंगात मरणे चांगले आहे. नियतीने जे लिहून ठेवलं आहे त्याला सामोरं जाण्यास तयार आहे”, असं म्हणत जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी विशेष न्यायालयासमोर रडायला सुरूवात केली. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांची काळजी घेतली जाईल, असे न्यायालयाने सांगितले. तसेच त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

नरेश गोयल यांना १४ सप्टेंबर रोजी केली होती अटक

काल( शनिवारी) नरेश गोयल यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयात हजर होण्यापूर्वी नरेश गोयल यांनी त्यांचा आरोग्य अहवाल सादर केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांना आजारी असलेल्या पत्नीची त्यांना आठवण येत असून, तिची काळजी घेण्यासाठी कोणीही नसल्याचे गोयल यांनी न्यायालयाला सांगितले. ७४ वर्षीय गोयल यांच्या पत्नी अनीता यांना कर्करोगाचे निदान झाले असून त्या सध्या उपचार घेत आहेत. नरेश गोयल यांना १४ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. नरेश गोयल यांना अटक केल्यानंतर ते आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समोर त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

न्यायाधीश काय म्हणाले?

नरेश गोयल यांची प्रकृती लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे म्हणाले, “न्यायालयाने त्यांच्या वकिलांना त्यांचा आजार लक्षात घेऊन काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक तपशीलाची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन न्यायालयाने दिले आहे.

त्यांना कोणाच्याही मदतीशिवाय उभे राहता येत नाही, याचीही न्यायालयाने दखल घेतली आहे. तुरुंग कर्मचाऱ्यांच्या मदतीलाही मर्यादा आहेत, असे न्यायाधीशांच्या टिप्पणीत लिहिले आहे.

न्यायाधीशांनी पुढे सांगितले की, “गोयल यांनी सांगितले आहे, त्यांना वारंवार वॉशरूममध्ये जावे लागते. काही वेळा लघवीद्वारेही रक्त बाहेर येते. जेजे रुग्णालयातही रुग्णांची संख्या जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत, कधीकधी डॉक्टरांना भेटण्यासाठी खूप वेळ लागतो. या सर्वांचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT