iaf 
देश

Airlift! 107 भारतीयांना घेऊन IAF चे विमान भारतात दाखल

कार्तिक पुजारी

भारतीय हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी अफगाणिस्तानच्या काबुलमधून उड्डाण करीत गाझीयाबादच्या हिंडन हवाई तळावर उतरले आहे.

नवी दिल्ली- भारतीय हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी अफगाणिस्तानच्या काबुलमधून उड्डाण करीत गाझीयाबादच्या हिंडन हवाई तळावर उतरले आहे. या विमानात 168 प्रवासी होते, यात 107 भारतीय नागरिक आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अनेक भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. त्यांना भारतात आणण्याचे काम सुरु आहे. आज सकाळी 87 प्रवाशांना घेऊन एक विमान भारतात पोहोचले होते.

भारतीय हवाई दलाचे C-17 विमान आज सकाळी पाच वाजता 168 प्रवाशांसह काबूलमधून उड्डाण केले होते. हे विमान गाझीयाबादमधील हिंडन या भारतीय हवाई दलाच्या तळावर दहाच्या सुमारास पोहोचले. 168 प्रवाशांमध्ये 107 भारतीय आहेत, तर काही अफगाण नागरिक आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांनी ट्विट करुन यांसदर्भातील माहिती दिली. माहितीनुसार, आणखी काही भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून केले जात आहेत.

दरम्यान, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात NATO नं भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सरकारला परवानगी दिली. सध्या नाटोचं काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियंत्रण आहे. दररोज दोन विमानांद्वारे अडकलेल्या नागरिकांना आपल्या देशात परत नेण्यास नाटोनं भारताला परवानगी दिली आहे. 25 विमानांचं सध्या नाटोकडून संचालन सुरु आहे. सध्या 300 हून अधिक भारतीयांना काबूलमधून बाहेर काढण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT