IAF Jawan dead body found after 56 years 
देश

Jawan Found After 56 Years: 56 वर्षांनंतर मिळाला जवानाचा मृतदेह! 1968 मध्ये कोसळलं होतं हवाई दलाचं विमान

मृतदेह लष्करी इतमामात जवानाच्या गावी आणण्यात आला. यानंतर सर्वांना अक्षरशः धक्काच बसला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : उत्तर प्रदेशातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये ५६ वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या एका जवानाचा मृतदेह आत्ता आढळून आला आहे. हा मृतदेह लष्करी इतमामात जवानाच्या गावी आणण्यात आला. यानंतर सर्वांना अक्षरशः धक्काच बसला. याशिवाय आणखी चार जणांचे मृतदेह आढळून आल्याचं सांगितलं जात आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार, मलखान सिंह असं मृतदेह सापडलेल्या शहीद जवानाचं नाव आहे. ७ फेब्रुवारी १९६८ मध्ये हिमाचल प्रदेशातील रोहतांग भागात हवाई दलाचं विमान AN 12 कोसळलं होतं. यामध्ये मलखान सिंह यांचा मृत्यू झाला होता. परंतू मोठी शोध मोहिम राबवूनही त्यांचा मृतदेह कुठेही आढळला नाही. कायम बर्फाच्छादित असलेल्या या भागात मृतदेह गाडला गेल्यानं तो आत्ता ५६ वर्षांनंतर आहे त्या स्थितीत आढळून आला आहे.

गुरुवारी सकाळी सहारनपूरमध्ये मलखान सिंह यांचं पार्थिव त्यांच्या वडिलांच्या गावी आणण्यात आलं. देशातील सर्वाधिक काळ सुरु राहिलेल्या या शोध मोहिमेत इतर चार जणांचे मृतदेह देखील आढळून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT