ias officer nitin sangwan shares class 12 cbsc mark sheet  
देश

आयएएस अधिकाऱयाची गुणपत्रिका पाहाच...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. बारावीच्या परिक्षेत काठावर पास होऊनही एखादा विद्यार्थी आयएएस होऊ शकतो. आयएएस अधिकारी नितीन संगवान यांनी हे करून दाखवले आहे.

नितीन संगवान यांनी ट्विटरवरून बारावीची गुणपत्रिका व्हायरल केली आहे. सीबीएसईच्या बारावी इयत्तेत ते 2002 मध्ये अगदी काठावर पास झाले आहेत. केमिस्ट्री या विषयात त्यांचे गुण घसरल्याचे गुणपत्रिकेत पाहायला मिळते. गुणपत्रिकेविषयी त्यांनी लिहिले आहे की, 'बारावी इयत्तेमध्ये मला केमिस्ट्रीमध्ये 24 गुण मिळाले होते. उत्तीर्ण होण्यासाठीच्या अपेक्षित गुणांपेक्षा अवघा एक गुण जास्त. पण, मला जीवनात काय साध्य करायचे होते, हे काही या गुणांना ठरवता आले नाही. त्यामुळे आपल्या पाल्यांवर गुणांच्या अपेक्षेचं ओझे देऊ नका. बोर्डाच्या या निकालांच्या पलीकडेहील एक सुंदर आयुष्य आहे.'

सोशल मीडियावर खुद्द आयएएस अधिकाऱ्याने  स्वत:चेच उदाहरण देत सर्वांपुढं आदर्श ठेवला आहे. अनेकांनीच त्यांचे हे ट्विट रिट्विटही केले आहे. सोशल मीडियावर नितीन संगवान यांची गुणपत्रिका व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

Satana Wedding Drama: बोहल्यावर नवरीचा ठाम नकार; वरात थेट सटाणा पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT