Sanjeev Khirwar Sakal
देश

IAS अधिकाऱ्याचा पराक्रम; कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडूंना हाकलले मैदानाबाहेर

सायंकाळ झाली की हे IAS अधिकारी मैदानाचा कब्जा घेत तेथील सराव करत असलेल्या सर्व खेळाडूंना हाकलून लावतात असं सांगण्यात येत आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : एका आयएएस अधिकाऱ्याच्या कुत्र्याला फिरवण्याच्या कारणावरून खेळाडूंनी मैदानाबाहेर हाकलून लावण्याची घटना दिल्लीत घडली आहे. IAS संजीव खिरवार असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याने काल सायंकाळी आपला कुत्रा फिरवण्यासाठी मैदानातील सर्व खेळाडूंना बाहेर हाकलून दिलं आहे. दिल्लीचे मुख्य सचिव खिरवार आपला कुत्रा फिरवायला सरकारी त्यागराज स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये फिरवायला घेऊन आले असताना त्यांनी खेळाडूंना बाहेर काढून दिलं आहे.

(Dog Walk Controversy)

दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती अशी की, खिरनार हे सायंकाळ झाली की मैदानावर कब्जा करतात. त्यानंतर मैदानावर सराव करत असलेल्या खेळाडूंना हाकलून दिलं जातं असं तेथील एका प्रशिक्षकाने सांगितलं. ते म्हणाले की "आम्ही आधी ८ ते साडेआठ वाजेपर्यंत सराव करत होतो. पण आता आम्हाला सात वाजले की बाहेर काढलं जातं. त्यामुळे आमच्या सरावावर परिणाम होत आहे." असं खेळांडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांनी माध्यमाला सांगितलं.

रिपोर्टनुसार मागच्या सात दिवसात सायंकाळी साडेसहा वाजता सिक्युरिटीकडून मैदानावरील खेळाडूंना बाहेर काढलं जात आहे. मैदानाचे अधिकारी अजित चौधरी यांनी सांगितलं की, "सायंकाळी आम्ही ४ ते ६ या वेळेत सरावासाठी परवानगी दिली आहे पण उन्ह्याळ्यामुळे आम्ही ७ वाजेपर्यंत सरावासाठी परवानगी दिली आहे. पण आम्हाला सायंकाळी सात वाजेच्या नंतर एखादा अधिकारी मैदानाचा वापर करतो हे माहिती नव्हतं." असं सांगत त्यांनी आपले हात वर करत आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान या प्रकरणानंतर विरोधी पक्षांनी आपवर टीकेची झोड उठवली आहे. दिल्लीतील भाजपचे प्रवक्ते प्रविण कपूर यांनी ट्वीट करत, "तुमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सरकारी ताकदीचा दुरूपयोग केला जात आहे. आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी मैदानाचा ताबा घेणे हे गंभीर आहे. या प्रकरणाची तपासणी करून कारवाई करण्यात यावी" असं त्यांनी ट्वीट करत म्हटलंय.

त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मैदाने रात्री दहा वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांनी ट्वीट करत दिली आहे. ते म्हणाले की, खेळाडूंच्या खेळाच्या सुविधा लवकर बंद करण्यात येत आहेत. त्यांच्या या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी रात्री १० वाजेपर्यंत मैदाने उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT