IAS Officer walking the dog Sakal
देश

कुत्र्याचे चोचले पुरवणं भोवलं; 'त्या' IAS अधिकाऱ्याची तात्काळ बदली

काही दिवसांपूर्वी या IAS अधिकाऱ्याने दिल्लीतलं एक स्टेडियम आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी रिकामं करायला लावलं होतं.

वैष्णवी कारंजकर

कुत्र्याला फिरवण्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्यानं दिल्लीतलं एक अख्खं स्टेडियमच रिकामं केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर आता हे आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांचीही बदली करण्यात आलेली आहे. (IAS officer emptied the stadium to walk the dog)

संजीव यांना लडाखला तर रिंकू यांना अरुणाचल प्रदेशात पोस्टिंग मिळालं आहे. या अधिकाऱ्याच्या कृत्याची माहिती मिळताच, गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे. गृहमंत्रालयाला (Ministry of Home Affairs) दिल्लीतल्या मुख्य सचिवांकडून माध्यमांच्या हवाल्याने ही माहिती मिळाली. त्यानंतर मुख्य सचिवांनी याबाबतचा अहवाल संध्याकाळी सादर केला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Delhi IAS Sanjiv Khirwar)

संजीव खिरवार आणि त्यांच्या पत्नी रिंकू दुग्गा हे दिल्लीतल्या एका स्टेडियमवर फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांचा कुत्राही सोबत होता. तेव्हा तिथल्या सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना संध्याकाळी सात वाजताच स्टेडियमबाहेर सांगण्यास सांगितलं. मात्र एरवी याहूनही उशिरापर्यंत स्टेडियम सुरू असतं आणि तिथे सराव सुरू असतो. स्टेडियम प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले आहे. व्यवस्थापक अजित चौधरींनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंच्या सरावासाठी अधिकृत वेळ ७ वाजेपर्यंतच आहे. त्यानंतर सर्वजण बाहेर पडतातच.

ह्या प्रकाराची दखल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही घेतली आहे. दिल्लीतली सर्व मैदानं खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांसाठी रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

World Cup 2025: 'आता विजयाची सवय लावायची...' वर्ल्ड कप विजयानंतर काय म्हणाली कॅप्टन हरमनप्रीत कौर?

SCROLL FOR NEXT