Viral tweet of IAS officer
Viral tweet of IAS officer esakal
देश

Viral Tweet: 'घरी जाण्यासाठी सुद्धा...' IAS महिलेचं ते ट्विट चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर एका IAS महिलेचं ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होतंय. या महिलेने नोकरी आणि रजेबाबतचं तिचं मत ट्विटरवर मांडलंय. तिच्या या ट्विट नंतर नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांमध्ये वादविवाद सुरू झाला. या ट्विटवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या खाजगी नोकरीमध्ये असलेल्या तणावाचं दुख व्यक्त केलंय तर अनेकांनी त्यांचा व्यवसाय असल्याने त्यांना कोणाची चाकरी करावी लागत नसल्याचं समाधानही या महिलेच्या ट्विटवर कमेंट करत व्यक्त केलंय. (IAS Sumita Mishra tweet on job and leave went viral on social media)

अॅग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर (Agriculture & Farmers Welfare) च्या अॅडिशनल चीफ सेक्रेटरी आणि हरियाणा पोल्यूशन कंट्रोलच्या सचिव डॉ. सुमिता मिश्रा यांचं हे ट्विट असून त्यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. 'नोकरी माणसाला कोणत्या मार्गावर घेऊन चालली. घरी जाण्यासाठी सुद्धा दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागते.' असं त्यांनी ट्विट केलंय. त्यांचं हे ट्विट बघताच अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. डॉ. सुमिता मिश्रा या त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बऱ्याच अॅक्टिव्ह असतात. अनेक विषयावर सोशल मीडिया माध्यमातून व्यक्त होणाऱ्या सुमिता यांचा ट्विटरवर मोठा फॉलोवींग वर्ग आहे.

नोकरीचं दु:ख सांगत अनेकांनी त्यांची व्यथा सांगितली

आतापर्यंत डॉ. सुमिता यांच्या ट्विटला ४० हजारांच्यावर लाईक्स आले आहेत. एका युजरने, 'लहानच असो पण स्वत:चा व्यवसाय कधीही उत्तम', असा कमेंट केलाय. खाजगी नोकरी करणाऱ्यांनीही यावेळी त्यांचं दु:ख व्यक्त केलं. 'सकाळी ७ ला जाणं आणि रात्री १०-११ घरी येणं. हे किती कष्टाचं काम आहे. घरच्यांसाठी वेळ अजिबात नसतो.' असे लिहत दुसऱ्या युजरने त्याची व्यथा मांडली आहे.

तर तिसऱ्या युजरने, '३५ वर्ष घरापासून दूर जंगलात कोंडत काढली. दिवाळी, दसरा आणि अनेक महत्वाचे सण घरापासून २०० किमी दूर जंगलात एकटे साजरे केल्याचं दु:ख' यावेळी सांगितलं. आयएस सुमिता मिश्रा यांची ट्विटर पोस्ट शेअर करत अनेकांनी त्यांच्या भावना डॉ. सुमिता यांच्या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT