देश

केरळ बॉम्बस्फोटात विदेशी विद्यार्थ्यांवर संशय? गुप्तचर विभागाची करडी नजर, परदेशी विद्यार्थींची मागवली यादी

'आयबी’ गोळा करतेय विदेशी विद्यार्थ्यांची यादी !तपास यंत्रणा अर्लट मोडवर;विद्यापीठांशी संपर्क, विभागाची सावधगिरी

Manoj Bhalerao

Kerala Bomb Blast:केरळमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तपास यंत्रणा जागी झाली असून राज्यासह देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून विदेशी विद्यार्थ्यांवर तपास यंत्रणेद्वारे करडी नजर ठेवण्यात येत आहे. इंटेलिजन्स ब्यूरोकडून विदेशी विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाकडून गोळा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यासह देशभरात विदेशातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. दरवर्षी त्यात काही विद्यापीठांमध्ये वाढ तर काही विद्यापीठांमध्ये घट होताना दिसते. हे विद्यार्थी शिक्षण घेतल्यावर त्यांची सध्याची स्थिती नेमकी काय आहे? हे अनेकदा विद्यापीठांना माहिती नसते. शिवाय याबाबत तपास यंत्रणांकडेही माहिती नसते.

दरम्यान शिक्षण घेत असतानाच, त्यांची संपूर्ण माहिती घेत, त्यांच्या वास्तव्याबाबत तपास यंत्रणेकडून आता इत्तंबूत माहिती गोळा करण्याचे काम इंटेलिजन्स ब्युरोने सुरू केले आहे. या कामाला वेग आला असून प्रत्येक विद्यापीठांमधून अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत विद्यापीठातील एका बड्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला. मात्र, त्यांनी अधिक बोलण्यास टाळले.

शाहनवाज सापडल्याने खळबळ

शहरातील व्हीएनआयटीमध्ये शिकलेला आणि आयएसआयच्या मोड्युलवर काम करणारा शाहनवाज याला महिनाभरापूर्वी दिल्लीत अटक झाली. शिकताना तो रतलामच्या अल सुफा या देशविरोधी संघटनेशी जुळला असल्याची बाब समोर आली होती. शिवाय तो स्फोटके तयार करण्यात तरबेज असल्याचेही समोर आले होते. दरम्यान अशा प्रकारांवर नजर ठेवण्यासाठीही तपास यंत्रणांकडून आता त्या अनुषंगाने सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

तीन विद्यार्थ्यांचे होते देशात वास्तव्य !

विशेष म्हणजे, इराकला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा लोगो आणि अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचा वापर करीत, नोकरीसाठी गेलेल्या काही विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी हे अनेक दिवस देशात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकाराने खळबळ उडाली होती.(Latest Marathi News)

स्वतः ला अपडेट करण्यासाठीहीआवश्‍यक प्रक्रिया

सुरक्षा यंत्रणेकडून अशाप्रकारे डाटा मिळवत, स्वतःला अपडेट करण्यावर भर देण्यात येत आहे. दूतावासाकडून याबाबत माहिती मिळत असली तरी, त्याबाबत स्वतंत्र माहिती घेत, तसा डेटाही तयार करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT