Anti-viral drug Molnupiravir sakal
देश

कोरोना उपचारात Molnupiravir चा वापर नाही; ICMR ने सांगितले कारण

जागतिक आरोग्य संघटना आणि ब्रिटनने देखील उपचारांमध्ये याचा समावेश केलेला नाही.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नॅशनल टास्क फोर्स ऑन कोरोनाव्हायरस (COVID19) ने कोरोना विषाणू संसर्गाच्या वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉलमध्ये अँटीव्हायरल (Indian Council of Medical Research) औषध मोलनुपिरावीरचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. ICMR तज्ज्ञांनी सुरक्षेच्या चिंतेचा हवाला दिला आणि सांगितले की, कोविडच्या उपचारात मोलनुपिरावीर जास्त फायदेशीर नाही. ((ICMR Not In Favor Of Molnupiravir in Covid 19 Treatment ))

आयसीएमआरचे प्रमुख डॉ बलराम भार्गव (ICMR Chief Dr Balram Bhargava) यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, “आम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, या औषधाशी संबंधित मुख्य सुरक्षा समस्या आहेत. यामुळे गर्भाची विकृती होऊ शकते आणि अनुवांशिक भिन्नतेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे स्नायूंनाही नुकसान होऊ शकते. त्याशिवाय औषध घेतल्यानंतर तीन महिने स्त्री आणि पुरुष दोघांनीही गर्भनिरोधक उपायांचा अवलंब करावा, असे भार्गव यांनी सांगितले होते. तसेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि ब्रिटनने देखील कोरोना उपचारांमध्ये याचा समावेश केलेला नसल्याचे भार्गव यांनी सांगितले होते.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार (Ministry of Health) , मोलानुपिरावीर हे अँटीव्हायरल औषध आहे जे SARS CoV2 चा वाढ होण्यापासून प्रतिबंधित करते. 28 डिसेंबर रोजी, भारताच्या औषध नियामकाकडून अँटी-कोविड टॅब्लेट (Anty Covid Tablet) मोलनुपिरावीरच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र, कोरोना उपचारात मोलानुपिरावीरचा वापर न करण्याचे ICMR ने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT