Mehbooba Mufti 
देश

कलम 370 रद्द केल्यास भारतासोबचे संबंध संपुष्टात येतील - मेहबुबा मुफ्ती 

सकाळवृत्तसेवा

जम्मू : जम्मू काश्मिर मधील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) या परस्पर विरोधी वाचरसरणीच्या पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार काही महिन्यांपुर्वी बरखास्त झाले. मात्र, त्यानंतर भाजप जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळवून देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न करत असल्याचा साकशात्कार जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना झाला.

एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत मुफ्ती यांनी ही माहिती दिली. परंतु, असे झाल्यास भारतासोबतचे संबंध कायमचे संपुष्टात येतील आणि नवीन अटिंसह भारताला पुन्हा वाटाघाटी कराव्या लागतील. असेही मुफ्ती म्हणाल्या. जम्मू काश्मिर हे मुस्लिम बहूल राज्य असून तुम्हाला त्याच्याबरोबर रहायचे नाही का असेही त्यांनी सांगितले.

मुफ्ती म्हणाल्या, 2018 च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 वर महत्त्वाच्या निर्णय देऊन जम्मू काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा असून कलम 370 हे तात्पुरत्या स्वरुपाचे नाही. कलम 370 नुसार संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे. इतर कुठलेही कायदे लागू करण्यासाठी त्यांना जम्मू-काश्मीर सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा विविध विशेष अधिकारांमुळेच राष्ट्रपतींना देखील या राज्याची घटना बरखास्त करण्याचा अधिकार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT