kuldeep sengar 
देश

माझे चुकले असेल तर फाशी द्या - कुलदीप सेंगर

पीटीआय

नवी दिल्ली - जर मी काही चुकीचे केले असेल तर मला फाशी देण्यात यावी आणि माझ्या डोळ्यात अॅसिड टाकून ते फोडण्यात यावेत, असा अजब युक्तिवाद उन्नाव बलात्कार प्रकरणातील प्रमुख सूत्रधार कुलदीप सेंगरने गुरुवारी न्यायालयात केला.

सेंगरवर उन्नाव बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांच्या मृत्युप्रकरणी दंडनीय मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणी न्यायालयात सुनावणीदरम्यान सेंगरने आपण निर्दोष असल्याचे न्यायालयासमोर आज सांगितले. सुनावणी सुरू असताना न्या. धर्मेश शर्मा यांच्यासमोर बोलताना त्याने पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात आपला हात नसल्याचे सांगताना मृत्यू समयी पीडितेचे वडील हे न्यायालयीन कोठडीत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यू मागे माझा कुठलाही सहभाग नाही असे म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी जर मी दोषी असेल तर मला फाशी द्या आणि माझे डोळे अॅसिड टाकून फोडून टाका अथवा मला न्याय असा युक्तिवादही त्याने यावेळी केला. तसेच मला दोन मुली असून मला निर्दोष मुक्त करण्यात यावे असे आवाहनही त्याने न्याधिशांकडे केले. तसेच या प्रकरणात सेंगर सोबत अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी पीडितेच्या वडलांच्या मृत्यू प्रकरणात आपला कुठल्याही प्रकारे सहभाग नव्हता असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT