Bangladeshi writer Taslima Nasreen
Bangladeshi writer Taslima Nasreen esakal
देश

आज पैगंबर हयात असते तर मुस्लिम कट्टरवाद्यांचा वेडेपणा पाहून..; काय म्हणाल्या नसरीन?

सकाळ डिजिटल टीम

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून देशातच नाही, तर परदेशातही निदर्शनं सुरू आहेत.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन कुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांनी प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून देशातच नाही, तर परदेशातही निदर्शनं सुरू आहेत. आता या प्रकरणावर प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन (Bangladeshi writer Taslima Nasreen) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

या मुद्द्यावरून भडकलेल्या निदर्शनांचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय. तसं त्यांनी ट्विटही केलंय. तस्लिमा नसरीन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, 'जर आज प्रेषित मोहम्मद हयात असते तर जगभरातील मुस्लिम कट्टरतावाद्यांचा वेडेपणा पाहून त्यांना धक्का बसला असता.' प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शुक्रवारी दिल्लीच्या जामा मशिदीबाहेर आणि काही राज्यांमध्ये हिंसक निदर्शनं झाली. दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाले आहेत. तर काही ठिकाणी सुरक्षा दलांना लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि हवेत गोळीबार करावा लागलाय.

दरम्यान, जम्मूमध्ये अधिकाऱ्यांनी काही भागात संचारबंदी लागू केलीय. शिवाय, काश्मीर खोऱ्यातील काही भागात बंदसारखी परिस्थिती निर्माण झालीय. याचवेळी आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी केलीय. तसंच झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीच्या काही भागात कडक आदेश लागू केलाय. यावेळी मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी करत आणि फलक हातात घेऊन नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी केलीय. नुपूर शर्मा ह्या भाजपच्या माजी प्रवक्त्या आहेत, तर जिंदाल हे पक्षाच्या दिल्ली युनिटचे माजी प्रमुख आहेत. भारतीय जनता पक्षानं आपल्या दोन्ही नेत्यांना प्रेषितांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल निलंबित केलंय. दिल्ली, जामा मशीद आणि इतर ठिकाणी, बहुतेक निदर्शनं शुक्रवारच्या नमाजानंतर झाली आणि पोलिसांनी अनेकांना अटकही केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT