IFS Jyoti Mishra UPSC Exam Fraud Esakal
देश

IFS Jyoti Mishra: देशात नक्की चाललयं तरी काय? दोन वर्षे IFS म्हणून वावरणारी ज्योती UPSC पासचं झाली नाही

Indian Embassy Spain: ज्योती मिश्राच्या सोशल मीडियावरील सत्कार सोहळ्याच्या पोस्ट पाहूण एका युजरने 2021 चा युपीएससीचा निकाल शोधला. त्यानंतर निकालात नाव असलेली ज्योती आणि IAF म्हणून वावरत असलेली ज्योती या वेगवेगळ्या असल्याचे समोर आले.

आशुतोष मसगौंडे

राज्यासह देशभरात सध्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे प्रकरण गाजत आहे. पूजाचे कारनामे समोर आल्यानंतर देशभरातून अशी अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. ज्यामध्ये युपीएससी परीक्षा पास होण्यासाठी उमेदवार गैरप्रकार करत आहेत. त्यामुळे आता नागरिकांमधू युपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

अशात आता यासंबंधीत आणखी एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका तरुणी युपीएससी परीक्षा पास न होताच दोन वर्षांपासून आयएफएस म्हणून वावरत आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील पोलीस आणि आमदारांकडून सत्कार सोहळे स्वीकारत आहे.

स्पेनमध्ये नियुक्तीचा दावा

पूजा खेडकर प्रकरणानंतर अशीच अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशाच्या रायबरेलीतील पोलीस उपनिरिक्षकाच्या मुलीने युपीएससीची परीक्षा पास झाल्याचा दावा केला होता. आपण आयएफएस झाल्याचे सांगून ही तरुणीने गेल्या दोन वर्षांपासून उत्तर प्रदेशातील पोलीस आणि आमदारांकडून सत्कार स्वीकारत आहे.

दोन वर्षांपूर्वी या तरुणीने आपण युपीएससी पास केली असून, स्पेनच्या मॅद्रीद शहरातील भारतीय दूतावासात आपली नियुक्ती झाल्याचा दावा केला होता.

अपयश सहन झाले नाही

रायबरेलीची असलेल्या ज्योती मिश्राने 2021 ची युपीएससी परीक्षा दिली होती. मात्र, यात ती पास झाली नाही. दरम्यान त्यावेळी ज्योतीच्या मैत्रिणी पास झाल्याने हे अपयश तिला सहन झाले नाही. त्यावेळी युपीएससीच्या निकालात ज्योती नावाच्या दुसऱ्या मुलीचे नाव होते, पण निकालात आलेले नाव आपलेच असल्याचे सांगत आपण IFS अधिकारी म्हणून स्पेनमध्ये रूजू झाल्याचे ज्योतीने सर्वांना सांगितले होते. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने सविस्तर वृत्त दिले आहे.

कसे समोर आले प्रकरण?

ज्योती मिश्राच्या सोशल मीडियावरील सत्कार सोहळ्याच्या पोस्ट पाहूण एका युजरने 2021 चा युपीएससीचा निकाल शोधला. त्यानंतर युजरला लक्षात आले की, निकालात नाव असलेली ज्योती आणि IAF म्हणून वावरत असलेली ज्योती या वेगवेगळ्या आहे.

या युजरच्या दाव्यानंतर ज्योतीने आपली बदनामी केली जात असल्याचा दावा केला. पण यानंतर आणखी काही सोशल मीडिया युजरने स्पेनमधील भारतीय दूतावासाला ईमेल करत ज्योती नावाच्या अधिकाऱ्याबाबत चौकशी केली. यानंतर या ईमेल्सना उत्तर देताना भारतीय दूतावासाने सांगितले की, आमच्याकडे ज्योती नावाची कोणतीही अधिकारी नाही. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT