देश

Corona Vaccine: भारतात तयार होतेय अधिक कार्यक्षम लस; IISCचं संशोधन सुरु

जास्त प्रमाणावरऑक्सिजन पुरवणारा ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरही बनवणार

Amit Ujagare (अमित उजागरे)

बंगळुरू : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्यातच लसीकरण मोहिमेनंही वेग घेतला आहे. मात्र, लस घेतल्यानंतरही अनेक जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. यापार्श्वभूमीवर सध्याच्या लसींपेक्षा अधिक प्रभावी लस बनवण्याचं काम बंगळुरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC) या संस्थेनं सुरु केलं आहे. यासंदर्भात कर्नाटकचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांची IISCचे संचालक प्रा. गोविंदन रंगराजन यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी कोरोनाच्या लढ्यात तुमच्या मदतीची गरज असल्याचं आवाहन सुधाकर यांनी रंगराजन यांना केलं. (IISC scientists working on a more efficient Covid 19 vaccine oxygen concentrator)

बैठकीदरम्यान, प्रा. रंगराजन यांनी मंत्री सुधाकर यांना माहिती देताना सांगितलं की, "सध्याच्या उपलब्ध लसींपेक्षा अधिक प्रभावी असलेल्या लसीची IISCकडून निर्मिती केली जात असून त्याचे चांगले परिणामही समोर आले आहेत. या लसीची मानवी चाचणी अद्याप सुरु झालेली नाही. या लसीची आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ही लस रुम टेम्प्रेचरमध्ये ३० डिग्री सेल्सिअसपर्यंत ठेवता येऊ शकते. त्याचबरोबर IISCचं ऑक्सिनजन कॉन्सट्रेटर्सवरही काम सुरु आहे."

प्रा. गोविंदन रंगराजन म्हणाले, "सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरपेक्षा अधिक प्रभावी ठरेल अशा ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरची निर्मिती केली जात आहे. IISCनं १० LPM क्षमतेचा ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर तयार केला आहे. बंगळुरु मेडिकल कॉलेजमध्ये क्लिनिकल व्हॅलिडेशनसाठी त्याची चाचणी सुरु आहे. या ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरमधून ९० टक्के ऑक्सिजन मिळू शकेल असे रिझल्ट आहेत.

दरम्यान, IISCच्या या लसीच्या क्लिअरन्ससाठी कर्नाटक सरकारकडून सर्व पाठिंबा मिळेल तसेच सेन्ट्रल ड्रग स्टॅंडर्ड कन्ट्रोल ऑर्गनायझेशनकडून (CDSCO) त्याच्या आपात्कालिन वापरासाठी मान्यता मिळवून देण्यात मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्री डॉ. सुधाकर यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...

Prakash Mahajan: मुंडे कुटुंबाचा वारस जाहीर करण्याचा अधिकार भुजबळांना नाही : प्रकाश महाजन

Latest Marathi News Live Update : जत तालुक्यातील राजारामबापू साखर कारखान्याचे बदललं नाव

Stock Market Opening: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी घसरले, कोणते शेअर्स वाढले?

Tilak Varma Diagnosed with Rhabdomyolysis: हातातून बॅट सुटली असती! तिलक वर्माने उघड केले 'ऱ्हॅब्डोमायोलिसिस'चे गुपित; काय आहे हा जीवघेणा स्नायूंचा आजार?

SCROLL FOR NEXT