IIT Guwahati come up with alternative to AC radiative cooling system no electricity required sakal
देश

आयआयटी गुवाहाटीने शोधला ‘एसी’ला पर्याय

रेडिएटिव्ह शीत प्रणालीची निर्मिती करण्यात यश, विजेची गरज नाही

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : गुवाहाटीतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मधील संशोधकांनी वातानुकूलित यंत्राला पर्याय ठरू शकेल, अशा रेडिएटिव्ह कुलर कोटिंग मटेरिअलचा आराखडा तयार केला असून त्यासाठी विजेची देखील गरज भासणार नाही. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हे मटेरिअल म्हणजे विद्युतमुक्त शीतप्रणाली आहे तिचा वापर छतावर देखील करता येतो. दिवसा आणि रात्री तिचा प्रभावीपणे वापर करणे सहज शक्य आहे. पॅसिव्ह रेडिएटिव्ह कुलिंग प्रणाली सभोवतालच्या वातावरणातील उष्मा इन्फ्रारेड रेडिएशनच्या माध्यमातून शोषून घेते आणि त्यानंतर त्याच उष्म्याचे उत्सर्जन देखील केले जाते. यामुळे ज्या ठिकाणी ही प्रणाली बसविण्यात आली आहे ती जागा पूर्णपणे थंड होण्यास मदत होते.

सर्वाधिक पॅसिव्ह रेडिएटिव्ह कुलर हे केवळ रात्रीच वापरण्यात येतात. दिवसामात्र या कुलरला काम करण्यासाठी सगळ्या सौर किरणांना परावर्तित करावे लागते, असे आयआयटी गुवाहाटीमधील संशोधक आशिषकुमार चौधरी यांनी सांगितले. आतापर्यंत काही कुलिंगप्रणाली या दिवसा पुरेशाप्रमाणामध्ये थंडावा निर्माण करत नसल्याचे आढळून आले होते. आम्ही हीच समस्या ध्यानात घेऊन परवडणारी आणि अधिक प्रभावी अशी प्रणाली तयारी केली असून ती चोवीस तास काम करू शकते असे या संशोधकांचे म्हणणे आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ फिजिक्स डी ः अप्लाईड फिजिक्स’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Van Accident : पुण्यात धक्कादायक अपघात! पोलीस व्हॅनने उडवल्या ७ गाड्या; CCTV व्हिडिओ व्हायरल

तू माझी इज्जत काढलीस यार... 'ती' हाक ऐकून भडकले होते लक्ष्मीकांत बेर्डे; अभिनेत्याने सांगितला न ऐकलेला किस्सा

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात २९११७ क्युसेक विसर्ग करण्यात येणार

CIDCO: सिडकोला धक्का! भूसंपादन भरपाईसंबंधी पक्षकार करण्यास नकार

Chandrakant Patil: मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये दैवी गुण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

SCROLL FOR NEXT