IIT Kanpur successfully conducted a test flight for cloud seeding on June 23 watch video  
देश

Watch Video : IIT कानपूरचं मोठं यश! आता दुष्काळी भागात पडणार कृत्रिम पाऊस

रोहित कणसे

आयआयटी कानपूरने कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत मोठं यश मिळवलं आहे. आयआयटी कानपूरकडून २३ जून रोजी क्लाउड सीडिंगसाठीचा चाचणी यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता आणि त्याचे नेतृत्व आयआयटी कानपूरच्या कंप्युटर सायन्स आणि इजिनीयरींग डिपार्टमेंट करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आयआयटी कानपूरला या प्रयोगात बुधवारी मोठे यश मिळाले. यादरम्यान पाच हजार फूट उंचीवरून सेसना एयरक्राफ्टच्या मदतीने आयआयटीच्या वरच्या हवेत रासायनिक पावडर टाकण्यात आली. यानंतर कृत्रिम पाऊस सुरू झाला. नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) परवानगीनंतर ही टेस्ट फ्लाइट घेण्यात आली.

कानपूरच्या कंप्युटर सायन्स आणि इजिनीयरींग डिपार्टमेंट प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, आयआयटी कानपूरमध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. यामध्ये क्लाउड सीडिंगसाठी चाचणी उड्डाण यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. अमेरिकेतील एका निर्मात्याकडून खरेदी केलेल्या क्लाउड-सीडिंग अटॅचमेंटसह सेसना विमान उडवण्यात आले. चाचणी उड्डाणात स्टँडर्ड सरावानुसार एजंट फ्लेअर्स वापरून पांगवण्यात आले.

दुष्काळात पाऊस पाडता येणार

वायू प्रदुषण आणि दुष्काळाच्या काळात कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो. आयआयटी कानपूर २०१७ पासून या प्रकल्पावर काम करत आहे, परंतु डीजीसीएच्या परवानगीअभावी हा प्रयोग अनेक वर्षांपासून रखडला होता.

सर्व तयारीनंतर डीजीसीएने टेस्ट फ्लाइटसाठी परवानगी दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारने क्लाउड सीडिंगच्या चाचणीसाठी अनेक वर्षांपूर्वी परवानगी दिली होती. परंतु डीजीसीएकडून परवानगी न मिळाल्याने हे प्रकरण अनेक वर्षांपासून रखडले होते. सर्व तयारीनंतर डीजीसीएने टेस्ट फ्लाइटसासाठी परवानगी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT