Corona patient
Corona patient Sakal
देश

15 जुलैपर्यंत भारत पूर्णपणे अनलॉक झाल्यास तिसरी लाट कधी?

योगेश कानगुडे

नवी दिल्ली : देशात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे (second wave of corona) गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. दुसरी लाट आता हळूहळू ओसरू लागली आहे. आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अनेक संशोधन संस्था आणि टास्क फोर्स यांच्याकडून वेगवेगळी भाकीतं वर्तवण्यात आली आहेत. अशातच करोनाची तिसरी लाट ही सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान येऊ शकते, असा अंदाज आयआयटी कानपूरचे (IIT Kanpur) प्राध्यापक राजेश रंजन आणि महेद्र वर्मा यांच्या टीमने केलेल्या अभ्यासातून वर्तवण्यात आला. (IIT-K team predicts three likely scenarios for 3rd wave, peak in Sept-Oct, 2-5 lakh cases per day)

या अभ्यासासाठी वापरलेल्या मॉडेलमध्ये लसीकरणाचा समावेश करण्यात आलेला नाही. लसीकरणामुळे येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा धोका खूप कमी असायला हवा. लसीकरणासोबत मॉडेलमध्ये काही आवश्यक सुधारणा करून अद्ययावत आकडेवारीवरून आणखी सखोल अभ्यास केला जाईल, असं या प्राध्यापकांनी म्हटलं आहे.

देशातील नागरिकांमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत भीतीचे वातावरण आहे. आम्ही एसआयआर या मॉडेलचा वापर करून दुसऱ्या लाटेतील डेटा आणि मापदंड विचारात घेऊन येणाऱ्या तिसऱ्या लाटेमुळे निर्माण होऊ शकणारी परिस्थिती मांडली आहे असं प्राध्यापक राजेश रंजन आणि महेद्र वर्मा यांच्या टीमने म्हटलं आहे. 15 जुलैपर्यंत देशातील निर्बंध पूर्णपणे हटवलेले असतील. पण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणारी तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेएवढी धोकादायक नसेल असे त्यांनी अभ्यासात नमूद केले आहे.

देशात करोनाची लाट ही मोठ्या प्रमाणात ओसरत आहे. देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर हा 5 टक्क्यांहून कमी झाला आहे. असं असली तरीही अनेक राज्यात पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांहून अधिक आहे असं या अभ्यासात म्हटले आहे. यामध्ये गोवा, केरळ मेघालय आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे.

15 जुलैपर्यंत भारत पूर्णपणे अनलॉक झाला तर काय होईल

जर 15 जुलैला देश पूर्णपणे अनलॉक झाला तर आयआयटी कानपूरमधील संशोधकांनी काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याबद्दल खालील अंदाज वर्तविले आहेत-

पहिल्या परिस्थितीत जिथे निर्बंध हटविले जातील, तिथे ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढेल. मात्र तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेएवढी धोकादायक नसेल. तसेच दररोज 3.2 लाख एवढ्या करोना रुग्णांची नोंद होऊ शकते.

दुसर्‍या परिस्थितीत एसएआरएस-सीओव्ही -2चे नवीन अधिक संसर्गजन्य व्हेरियंट निर्माण होऊ शकतात असे संशोधकांना वाटते. जर देशात कुठल्याही प्रकारचे लॉकडाउन किंवा निर्बंध नसतील तर तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा मोठी असू शकते. दररोज नवीन संक्रमणांची संख्या ही 5 लाखांपर्यंत पोहोचू शकते. ही सर्वात वाईट परिस्थिती आहे परिस्थिती असू शकते.

तिसऱ्या परिस्थितीत ऑक्टोबरच्या अखेरीस तिसरी लाट येऊ शकते. जर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबविल्या गेल्या तर तिसर्‍या लाटेची तीव्रता ही दुसर्‍या लाटेपेक्षा कमी असेल. यामध्ये दररोज दोन लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT