IIT News Esakal
देश

IIT Delhi: मंदीतही संधी! आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चार कोटींच्या पॅकेजची ऑफर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या पगाराची ऑफर आयआयटीच्या (IIT) विद्यार्थ्यांना मिळाली आहे. देशातल्या टॉप संस्थांमध्ये सध्या प्लेसमेंट ड्राईव्ह सुरु आहे.

जगभरामध्ये मंदी आणि महागाईचं संकट सुरु आहे. त्यामुळे कित्येक बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरुय. त्यातच दिल्ली, मुंबई आणि कानपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांना तब्बल ४ कोटी रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर मिळाल्याची माहिती आहे. जेन स्ट्रीटकडून विद्यार्थ्यांना हे वार्षिक पॅकेज मिळालं आहे. 'आज तक'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

मागच्या वर्षी सर्वात जास्त २.१६ कोटी रुपायंच्या पगाराची ऑफर ऊबरने आयआयटीच्या विद्यार्थ्यांना दिली होती. त्याशिवाय १ डिसेंबरला सुरु झालेल्या प्लेसमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय नोकरीसाठी २.४ कोटी रुपये आणि भारतात १.३ कोटी रुपये वर्षिक पॅकेज मिळालं आहे.

पहिल्या दिवशी आयआयटी गुवाहाटी, रुडकी आणि मद्रासमध्ये एकूण ९७८ विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजची ऑफर मिळाली आहे. इंजिनिअरिंगच्या या तीन टॉप महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल जॉबच्या ऑफर मिळाल्या आहेत. IIT मद्रासचा प्लेसमेंट यावेळी मागच्या वर्षीपेक्षा १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT