देश

आठवीच्या पाठ्यपुस्तकात रॉकेट लाँचर आणि कुराण घेतलेला दहशतवादी?

सर्व मुस्लीम बांधव दहशतवादी असल्याची प्रतिमा तयार होऊ शकते, असा दावा स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने केला आहे.

ओमकार वाबळे

तेलंगणात इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात मुस्लीम धर्माशी निगडीत एक फोटो वापरला आहे. मात्र हा प्रतिकात्मक फोटो दहशतवाद्यांशी तुलना करत असल्याचं समोर आलंय. यामुळे सर्व मुस्लीम बांधव दहशतवादी असल्याची प्रतिमा तयार होऊ शकते, असा दावा स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने केला आहे. तसेच या संस्थेने राज्य सरकारला हस्तक्षेप करत हा फोटो काढून टाकण्याची मागणी केली आहे. याच्याशी संबंधित खासगी प्रकाशकांवर कारवाई करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.

या प्रकरणात, एका माणसाच्या उजव्या हातात रॉकेट लाँचर आणि दुसऱ्या हातात कुराण धरलेलं दाखवलं आहे. सामाजिक अभ्यासाच्या पुस्तकात 'दहशतवाद' असे मथळा देऊन हा धडा समाविष्ट करण्यात आलाय. 'राष्ट्रीय चळवळ - शेवटचा टप्पा 1919 ते 1947' या अध्यायात राजकीय व्यवस्था आणि प्रशासनासंदर्भातील आलेखात हे चित्र प्रकाशित झाले आहे.

हे चित्र मुस्लीम समुदायविषयी रुढीवादी, द्वेषपूर्ण आणि इस्लाविरोधात दृष्टिकोन तयार करत असल्याचे स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. ही भेदभाव आणि द्वेषपूर्ण माहिती आहे. यामुळे समाजाचे सौहार्द, ऐक्य आणि अखंडता नष्ट होते, असेही स्टुडंट ऑर्गनायझेशनने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT