IMD predicts early arrival of monsoon  Esakal
देश

Weather Updates: यंदा मान्सून कधी होणार दाखल? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली माहिती, अंदमानमध्ये 'या' तारखेला एन्ट्री

Mansoon Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार पाहा मान्सून कधी दाखल होऊ शकतो.

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरुच आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीटीचा मोठा फटका बसला. अशातच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार पाहा मान्सून कधी दाखल होऊ शकतो.

नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) रविवारी (ता. १९) त्याची पहिली हजेरी दक्षिण अंदमानचा समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि दक्षिण निकोबार बेटांमध्ये लावेल. मॉन्सून २१ मेपर्यंत पोर्टब्लेअरमध्ये हजेरी लावतो. त्याआधी त्याची दमदार हजेरी दक्षिण अंदमानच्या समुद्रात लागते. या वर्षी रविवारी मॉन्सून अंदमान समुद्रात दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. दरवर्षी 22 मे रोजी मान्सून या भागात पोहोचतो, मात्र यंदा तो तीन दिवस आधी दाखल होणार आहे.

केरळमध्ये १ जूनच्या आसपास मान्सून दाखल होत असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकतो. 15 जुलैदरम्यान तो संपूर्ण देशभरात पोहोचतो. यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज आधीच हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

यंदा १९ मे रोजी मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी देखील १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर आगमन लांबल्याने ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून ११ जून रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकणात पोचला होता.

यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

Pune Civic Negligence: मुंढव्यात निकृष्ट सांडपाणी कामामुळे रस्त्यात खोल खड्डा; ट्रक अडकला, महापालिकेवर नागरिकांची झोड

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT