Indian Army
Indian Army esakal
देश

Agnipath Scheme : ज्यांना 'अग्निपथ'बाबत अडचण आहे, त्यांनी सैन्यात भरती होऊ नये; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

सकाळ डिजिटल टीम

'आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सच्या तज्ञांनी मोठ्या प्रयत्नांनंतर ही योजना सुरु केली आहे.'

अग्निपथ योजनेबाबत (Agnipath Scheme) दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi High Court) महत्वपूर्ण टिप्पणी केलीय. दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्राच्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांना विचारलं की, 'अग्निपथ योजनेमुळं तुमच्या कोणत्या अधिकारांचं उल्लंघन झालं आहे?'

न्यायालयानं म्हटलं की, अग्निपथ योजना ऐच्छिक आहे. ज्यांना याबाबत कोणती अडचण असेल, त्यांनी सशस्त्र दलात भरती होऊ नये. भरतीसाठी अग्निपथ योजना भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील तज्ज्ञांनी तयार केलीय. न्यायाधीश हे लष्करी तज्ञ नसतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठानं सांगितलं की, या योजनेत काय चूक आहे ते दाखवून द्यावं. स्पष्टपणं सांगायचं झालं तर, आम्ही लष्करी तज्ञ नाही आहोत. आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सच्या तज्ञांनी मोठ्या प्रयत्नांनंतर ही योजना सुरु केली आहे. सरकारनं याबाबत विशेष धोरण केलं आहे. हे अनिवार्य नाही, ते ऐच्छिक आहे. कोणते अधिकार काढून घेतले आहेत हे सिद्ध करावं, अन्यथा यात सामील होऊ नये. कोणतीही सक्ती नसेल. जर तुम्ही चांगले असाल तर त्यानंतर (चार वर्षांनंतर) तुम्हाला कायमस्वरूपी समाविष्ट केलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

युक्तिवादात भाग घेतलेल्या आणखी एका याचिकाकर्त्यानं सांगितलं की, मी लष्करातून निवृत्त झालो असून आता कायद्याचं शिक्षण घेत आहे. अग्निपथ योजनेबाबत पुनर्विचार करण्यास अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे. कारण, अग्निवीरांना दिलेलं सहा महिन्यांचं प्रशिक्षण पुरेसं नाही. इतक्या कमी वेळात प्रशिक्षण घेणं सोपं नाही. अशा प्रकारे अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करतील आणि सैनिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल, असा दावा त्यांनी केलाय. दुसर्‍या याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वकील अंकुर छिब्बर म्हणाले, चार वर्षांच्या सेवेत जवानांमध्ये आपुलकीची भावना राहणार नाही.

अग्निपथ योजना काय आहे?

दिल्ली उच्च न्यायालयात केंद्राच्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. अग्निपथ योजना 14 जून 2022 रोजी सशस्त्र दलात (अग्नवीर भारती) तरुणांच्या भरतीसाठी सुरू करण्यात आली होती. योजनेच्या नियमांनुसार, 17 ½ ते 21 वर्षे वयोगटातील युवक अर्ज करण्यास पात्र आहेत. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सैन्यात भरती केलं जाईल. योजनेंतर्गत, भरती झालेल्या तरुणांपैकी 25 टक्के नियमित केले जातील. अग्निपथ लॉन्च झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये या योजनेला विरोध सुरू झाला. नंतर सरकारनं 2022 मध्ये भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT