देश

18 राज्यांमध्ये संक्रमणाचा दर 20 टक्क्यांहून जास्त; आरोग्य मंत्रालयाची माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) साथीच्या प्रादुर्भावादरम्यान आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) गुरुवारी माध्यमांना संबोधित करताना महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल (Lav Agarwal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 18 राज्यांमध्ये कोरोनाच्या संक्रमणाचा दर 20 टक्क्यांहून अधिक आहे. त्यांनी म्हटलंय की, देशात 12 राज्यांमध्ये 50 हजार ते एक लाखादरम्यान ऍक्टीव्ह रुग्णसंख्या आहे. 16 राज्ये अशी आहेत ज्याठिकाणी 50 हजारहूनही कमी ऍक्टीव्ह रुग्णसंख्या आहे.

देशात आतापर्यंत 83.26 टक्के रुग्ण बरे

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 83.26 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. देशात जवळपास 37.1 लाख ऍक्टीव्ह रुग्णसंख्या आहे. तीन मेला रिकव्हरी रेट 81.3 टक्के होता ज्यानंतर रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 3,62,727 नवे रुग्ण आढळले आहेत. (Health Ministry On Coronavirus Cases In India All Updates)

देशात 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 15 टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्हीटी रेट आहे. 5 ते 15 टक्के पॉझिटीव्हीटी रेट 8 राज्यांमध्ये आहे. 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी रेट चार राज्यांमध्ये आहेत.

10 राज्यांमध्ये संक्रमणाचा दर 25 टक्क्यांहून अधिक

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांच्या सांगण्यानुसार 10 राज्यांमध्ये संक्रमणाचा दर 25 टक्क्यांहून अधिक आहे आणि 18 राज्यांमध्ये संक्रमणाचा दर 20 टक्क्यांहून अधिक आहे. ही एक चिंतेची बाब आहे, ज्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

17 कोटींहून अधिक लोकांना लस

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं की, लसीकरणाच्या अभियानामध्ये गती आली आहे. आतापर्यंत 17 कोटींहून अधिक लोकांना लस दिली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT