देश

सुप्रीम कोर्टात एकाचवेळी ९ न्यायाधीशांसोबत 'हे' पहिल्यांदाच घडलं!

विनायक होगाडे

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात आज पहिल्यांदाच तब्बल नऊ न्यायाधीशांनी एकत्रित शपथ घेतली. विशेष म्हणजे यात तीन महिला न्यायाधीशांचाही समावेश आहे. यातील बी.व्ही नागरत्ना २०२७ मध्ये देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनू शकतात. त्याचप्रमाणे, न्यायाधीश पी.एस. नरसिंह २०२८ मध्ये सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे. न्या. पी.एस.नरसिंहा हे बार कौन्सिलमधून सर्वोच्च न्यायालयात थेट नियुक्त होणारे पहिले न्यायाधीश आहेत.

न्यायाधीश नागरत्ना यांची २००८ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, २०१२ मध्ये त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या होत्या. खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी न्या. नागरत्ना आणि इतर न्यायाधीशांना प्रसारमाध्यमांवरील नियंत्रणाबाबत केंद्र सरकारला सूचना केली होती. आज शपथ घेतलेल्या दुसऱ्या महिला न्यायाधीश हिमा कोहली तेलंगण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या. उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश होणाऱ्या त्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या.

या न्यायाधीशांचा समावेश

न्यायाधीश बेला त्रिवेदी गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या. राजस्थान उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. न्यायाधीश श्रीनिवास ओका (मुंबई उच्च न्यायालय), न्या. विक्रम नाथ (गुजरात उच्च न्यायालय), न्या. जितेंद्र कुमार माहेश्वरी (सिक्किम उच्च न्यायालय), न्या. एम.एम.सुंदरेश, न्या. सीटी रवी (केरळ उच्च न्यायालय) यांनीही शपथ घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी पोलिसांच्या ताब्यात; सहाशेपेक्षा जास्त आंदोलकांना पोलिसांनी उचललं, आकाशवाणीजवळ दगडफेक

Balinga Dhonwade Road : कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील दोनवडे-बालिंगा रस्त्याचे काम अपूर्ण; प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, कधी पूर्ण होणार काम?

मुंबईची मुलगी... रियाच्या घरी पोहोचले पोलीस! CJP आंदोलनाची केली चौकशी अन्... नेमकं काय घडलं? Video

Marathi News Live Updates : दिल्लीनंतर आता मुंबई-पुण्यातही आंदोलकांची धरपकड, १५० जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

''ज्या देशाने परकियांचा माज उतरवला, तिथे स्वकियांचा माज जनता उतरवणार नाही वाटतं का?'' राज ठाकरे संतापले...

SCROLL FOR NEXT