Raj Thackeray Slams Modi-Shah
esakal
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, जंतरमंतरवर आंदोलन सुरू होण्यापूर्वीच काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.