Supreme Court delhi Sakal
देश

सर्वोच्च न्यायालयाचा आज ऐतिहासिक दिवस; सुनावणीचं पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग

धनश्री ओतारी

देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा आज म्हणजेच २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. रमण्णा हे निवृत्त होत असताना सुनावणीदरम्यान पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग होत आहे.(In a first, Supreme Court to live-stream proceedings today Chief Justice of India NV Ramana)

फ्रीबी प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आज थेट प्रक्षेपित होणार आहे. निवर्तमान सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील सेरेमोनिअल बेंचसमोर खटले चालवले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 20 केसेसचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी हे केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, आज सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीशांच्या न्यायालयाची किंवा औपचारिक खंडपीठाची कार्यवाही NIC (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) वेबकास्ट पोर्टलद्वारे थेट प्रक्षेपित केली जाईल.

रमण्णा हे निवृत्त होत असताना त्यांनी त्यांचे नावे एक मोठा रेकॉर्ड केला आहे. न्यायपालिकेत आतापर्यंत सर्वात जास्त न्यायाधीशांची नेमणुक करणाऱ्या सरन्यायाधिशांच्या यादीत रमण्णांचा पहिल्या क्रमांकावर आले आहेत. त्यांनी एक वर्षाहून कमी कालावधीत १०० पेक्षा जास्त न्यायाधिशांची नेमणुक हायकोर्टात आणि पाचपेक्षा जास्त न्यायाधीशांची सुप्रीम कोर्टात नेमणुक केलेली आहे. त्यामुळं आता निवृत्त होत असताना त्यांनी न्यायाधिशांच्या नियुक्त्यांबाबतचा एक मोठा विक्रम त्यांच्या नावावर केला आहे.

एन. व्ही. रमण्णा यांची 17 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली होती. त्यांनी देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ गेल्यावर्षी म्हणजेच 24 एप्रिल 2021 रोजी घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT