love affair  File photo
देश

आईचे काकांसोबत प्रेमसंबंध, मुलींचा घरी परतण्यास नकार

मुलींनी दोघांना परस्परांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. मुली घरामध्ये असतानाच दोघे शरीरसंबंध ठेवायचे.

दीनानाथ परब

अहमदाबाद: आई-वडिलांच्या चुकीच्या वागण्याचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. अलीकडेच गुजरातमध्ये (Gujarat) असं एक प्रकरण समोर आलं आहे. ज्या मध्ये नातेवाईकांकडे राहणाऱ्या दोन बहिणी आपल्या आई-वडिलांच्या घरी जायला तयार नव्हत्या. काही दिवसांपूर्वी अभयम (Abhyam) १८१ हेल्पलाईनला एक फोन आला होता. पलीकडून फोन करणाऱ्या व्यक्तीने समुपदेशकांकडे (Counsellor) त्यांची अडचण मांडली. त्यांच्या घरी राहणाऱ्या दोन मुली आई-वडिलांकडे परत जायला तयार नव्हत्या. अहमदाबादच्या (Ahmedabad) गोटा भागात या मुलींचे आई-वडिल राहतात. फोन करणाऱ्या व्यक्तीची समस्या ऐकून घेतल्यानंतर समुपदेशकांची टीम मुलींसोबत बोलण्यासाठी नारोल येथे पोहोचली.

"आपल्याला घरी परत जायचे नाही, असेच त्या मुली सांगत होत्या. समुपदेशकांनी मुलींना घरी न परतण्याचं कारण विचारलं. त्यांना बोलतं केलं. त्यावेळी सत्य परिस्थिती समोर आली. आईचे काकांसोबत प्रेमसंबंध आहेत. वडिलांच्या लहान भावासोबत आईचे सूर जुळले आहेत. त्यांचे हे संबंध नवीन नाहीत. पण लॉकडाउनच्या काळात वडिल बाहेर असताना, आई आणि काका अधिकच जवळ आले" असे समुपदेशकाने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मुलींनी दोघांना परस्परांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. मुली घरामध्ये असतानाच दोघे शरीरसंबंध ठेवायचे. याबद्दल बाहेर कुठे वाच्यता केली, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी मुलींना दिली होती.

"समुपदेशकांनी मुलीच्या आईकडे या बद्दल विचारणा केली. त्यावेळी तिने आपले दीरासोबत प्रेमसंबंध असल्याचे कबुल केले. मला दीरासोबत रहायचे आहे, असे तिने सांगितले. महिलेच्या नवऱ्याला यामुळे धक्का बसला. मुलीच्या वडिलांनी ते दोघींना यापासून दूर उत्तर प्रदेशातील मूळ गावी घेऊन जाणार असल्याचे सांगितले" समुपदेशकाने ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT