Dog Sakal
देश

अमानुष! कुत्र्याच्या मारहाणीचा पोलिसांनी दिला खोटा रिपोर्ट; कोर्टाकडून FIR दाखल करण्याचे आदेश

काय घडलंय नक्की? जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रस्त्यावरील भटक्या कुत्र्याला आपल्या लाठीनं बेदम मारहाण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांतील एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थानिक कोर्टानं दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. (In human police gave false report of killing a stray dog Court orders filing of FIR on Police)

याप्रकरणी डॉ. अशेर जेसुदोस आणि निहारिका कश्यप यांनी कोर्टाकडे दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. यानंतर कोर्टानं पोलिसांकडून याबाबत अहवाल मागवला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट कोर्टात सादर केला, यामध्ये चौकशीनंतर असं दिसून आलं की, आरोपी पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना रस्त्यावर संबंधिक कुत्रा त्यांच्या मागे धावला आणि त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला. त्यानंतर स्वतःच्या संरक्षणासाठी त्या पोलिसानं कुत्र्याला आपल्या हातातील दंडुक्यानं मारहाण केली.

लाईव्ह लॉच्या माहितीनुसार, पोलिसाकडून भटक्या कुत्र्याला लाठीनं मारतानाचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये संबंधित कुत्रा रस्त्यावर झोपलेला असताना तसेच त्यानं पोलिसावर कुठलाही अटॅक केलेला नसताना त्याला लाठीनं एकसारखं बेदम मारहाण करण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर संबंधीत कुत्रा गंभीर जखमी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT