देश

भारत विनाअट मदत करतो - नरेंद्र मोदी 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - ‘‘ भारत विकासासाठी अन्य देशांना सहकार्य करताना अटी घालत नाही तसेच विकासाच्या नावाखाली आम्ही शेजारी देशांवर आमच्या अटी मानण्याची सक्तीही करत नाही,’’ असे सूचक प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनला टोला लगावला.

मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्र जगन्नाथ यांच्यासह त्यांच्या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचे  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन केले. ४७०० स्वे.मीटर परिसरातील ही इमारत बांधण्यासाठी भारताने ३५.३ कोटी डॉलरचे विशेष अर्थ व तांत्रिक सहाय्य दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्य मदतीने ही इमारत मुदतीआधीच बांधून तयार करण्यात आली आहे. याशिवाय मॉरेशियस मेट्रोचा पहिला टप्पा व ईएनटी अत्याधुनिक रुग्णालयासाठीही भारताने त्या देशास मदत केली आहे. प्रवींद्र जगन्नाथ यांनीही आजच्या कार्यक्रमात हिंदीतून भाषण केले. 

कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी केलेल्या कुशल व्यवस्थापनाबद्दल मॉरेशियस सरकार व तेथील जनतेचे अभिनंदन करून मोदी म्हणाले की ‘‘आमचे विकास सहकार्य कोणत्याही अटी व शर्तींच्या आडून येत नाही.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोदी जी, तुमच्या सहकार्याबद्दल देश व जनता भारताचे आभारी आहोत. 
- प्रवींद्र जगन्नाथ,  पंतप्रधान मॉरिशस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT