Income Tax Raid Noida e sakal
देश

भाड्याच्या घरात नोटांची थप्पी, आयकर विभागाकडून सुमारे चार कोटी जप्त

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर नोएडा पोलिसांनी (Noida Police) छापेमारी सुरू केली आहे. अशाच एका छापेमारीत सुमारे चार कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नोएडा पोलिस आणि आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोएडातील गौतम बुद्ध नगर पोलिसांकडून शस्त्रास्त्र, दारू आणि इतर प्रतिबंधित वस्तूंच्या तस्करीवर सातत्याने नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सेक्टर ४४ मध्ये प्रेमसिंग यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याची गुप्त माहिती नोएडा पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी प्रेमसिंग यांच्या घरी छापा टाकला. घराची झाडाझडती घेतली काही रोख रक्कम आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती आयकर विभागाला दिली. आयकर विभागाने घटनास्थळी पोहोचून रक्कम मोजली असता ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपये होते. त्यानंतर आयकर विभागाने ही रक्कम जप्त केली.

यापूर्वी देखील नोएडामधील एका माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. त्यांच्या घरी तब्बल ६५० लॉकर होते. त्यामधून कोट्यवधी रुपये आयकर विभागाने जप्त केले होते. मात्र, हे पैसे आमचे नसून आम्ही लोकांना पैसे ठेवण्यासाठी लॉकर भाड्याने देतो, असं माजी आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलं होतं. त्यानंतर आज ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रेमसिंगचे स्वतःचे घर नाही. तो एका भाड्याच्या घरात राहतो. त्यामुळे त्याच्याजवळ इतकी रक्कम आली कशी? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT