BJP MODI SHAH 
देश

उमेदवाराला विरोध म्हणून विद्यमान खासदाराने मतदान सुद्धा केले नाही! भाजपने पाठवली कारणे दाखवा नोटीस

Jayant Sinha Show cause notice: भारतीय जनता पक्षाने आपल्याच एका खासदाराला नोटीस पाठवली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. पाच टप्प्यातील मतदान पार पडले, आणखी दोन टप्पे शिल्लक असून ४ जूनला मतमोजणी होईल. त्याआधी भारतीय जनता पक्षाने आपल्याच एका खासदाराला नोटीस पाठवली आहे. तुम्ही पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला नाही. मतदान सुद्धा केलं नाही, असं म्हणत पक्षाने नोटीस पाठवली आहे.

माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटिसीमध्ये म्हणण्यात आलंय की, 'तुम्ही पक्षाच्या संघटनात्मक कामात रस घेतला नाही. शिवाय कोणती सभा, रॅली किंवा बैठक घेतली नाही. पक्षाचे हजारीबाग मतदारसंघाचे घोषित उमेदवार मनिष जैस्वाल यांचा तुम्ही प्रचार केला नाही. तुम्ही मतदान सुद्धा केलं नाही.'

जयंत सिन्हा हे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र आहेत. भाजप झारखंडचे महासचिव अदित्या साहू यांनी जयंत सिन्हा यांना ही नोटीस पाठवली आहे. साहू म्हणालेत की, 'तुम्ही पक्षासाठी योगदान देण्यासाठी काहीही कष्ट घेतलेलं नाही. तुमच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे.' विद्यमान हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा यांच्याकडून भाजपने दोन दिवसात उत्तर मागितले आहे.

विशेष म्हणजे यशवंत सिन्हा यांचे पुत्र आशिष सिन्हा झारखंडमधील बर्हीच्या इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थिती राहिले होते. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे हजर होते. आशिष सिन्हा यांनी यावेळी काँग्रेसचे उमेदवार जेपी पटेल यांना समर्थन जाहीर केले होते. त्यानंतर भाजपने ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.

भाजपने हजारीबाग लोकसभा मतदार संघातून जयंत सिन्हा यांचं तिकीट कापून मनीष जैस्वाल यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे खासदार सिन्हा नाराज होते असं बोललं जातं. त्यामुळेच त्यांनी प्रचार कार्यात सहभाग घेतला नाही. ते भाजपच्या नोटिसीला काय उत्तर देतात हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT