Udhayanidhi Stalin 
देश

IND vs PAK क्रिकेट सामन्यात 'जय श्री राम'चा नारा, उदयनिधी स्टॅलिन भारतीय चाहत्यांवर संतापले

Sandip Kapde

Udhayanidhi Stalin: अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला. रोहित शर्माच्या संघाने बाबर आझमच्या संघाचा 7 विकेट्सने पराभव केला. सामन्यादरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचे प्रेक्षकांनी भरले होते. यावेळी प्रक्षेक घोषणा देत होते. अनेक प्रेक्षकांनी जय श्री रामचा नारा देत भारतीय संघाला पाठिंबा दिला होता.

दरम्यान, एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या या घोषणाबाजीवर नाराज आहेत. या घोषणाबाजीवर त्यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी या सामन्याचा व्हिडिओ शेअर करून नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी खेळाडू खेळानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसत आहे. यावेळी  पाकिस्तानी खेळाडूसमोर स्टेडियमच्या गॅलरीत बसलेले चाहते मोठ्याने जय श्री रामच्या घोषणा देत आहेत.

पाकिस्तानी खेळाडूंसोबत असे वागणे अस्वीकार्य असल्याचे उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटले आहे. पॅव्हेलियनच्या दिशेने येताना दिसणारा पाकिस्तानी खेळाडूच्या टी-शर्टच्या मागील बाजूस 16 लिहिलेले आहे. यावरून तो क्रिकेटपटू रिझवान असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, "भारत त्यांच्या खिलाडूवृत्तीसाठी आणि आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानी खेळाडूंना दिलेली वागणूक अस्वीकार्य आहे. खेळ ही राष्ट्रांमध्ये एकता निर्माण करणारी शक्ती बनली पाहिजे आणि खऱ्या बंधुभावाला प्रोत्साहन दिले पाहिजे. द्वेष पसरवण्याचे साधन म्हणून त्याचा वापर करणे योग्य नाही.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT