delhi police  Sakal
देश

Independence Day: दिल्लीत हल्ल्यांचा कट!, ईशान्येकडील बंडखोर तयारीत असल्याचा दावा

माध्यमांनी गुप्तचर यंत्रणांमधील सुत्रांच्या हवाल्यानं हा दावा केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनी अर्थात उद्या १५ ऑगस्ट रोजी राजधानी दिल्लीतील काही मोक्याच्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या हालचाली सुरु असल्याचं इंडिया टुडेनं गुप्तचर यंत्रणांमधील सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

पाकिस्तान पुरस्कृत काही दहशतवादी संघटनांकडून तसेच ईशान्येकडील बंडखोर गटांकडूनही या हल्ल्यांचं नियोजन करण्यात येत असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. (Independence Day 15 August Possibility of attacks in Delhi Will be involvement of NER rebel groups)

दहशतवादी हल्ल्यांसाठी दिल्लीतील काही महत्वाचे रस्ते, रेल्वे स्थानकं आणि दिल्ली पोलिसांची कार्यालये आणि एनआयएचं मुख्यालय ही ठिकाणं निवडली जाऊ शकतात. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मुहम्मद या दहशतवादी संघटनांकडून हा हल्ल्याचा विचार असल्याचं मीडिया हाऊसनं गुप्तचर यंत्रणांमधील सुत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

या पार्श्वभूमीवर दिल्ली शहरात दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली असून ठिकठिकाणी वाहनांची पेट्रोलिंग आणि तपासणी केली जात आहे. शहरात सध्या १०,००० पोलिसांची नजर असून १,००० कॅमेऱ्यांच्या मार्फतही देखरेख केली जात आहे. तसेच अँटि ड्रोन सिस्टिम आणि इतर हेरगिरी करणारी यंत्रणा लाल किल्ला परिसरात तैनात आहे. याच किल्ल्यावरुन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. (Latest Marathi News)

फेब्रुवारीत मिळाले होते इनपुट

गुप्तचर यंत्रणांकडून फेब्रुवारी महिन्यातच याबाबत सुरक्षा यंत्रणांना घातपाताची इनपुट्स मिळाली होती. त्यानंतर मे महिन्यात दुसऱ्यांना सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली की लष्कर ए तोयबाकडून या हल्ल्याला अंतिम स्वरुप दिलं जाऊ शकतं.

तसेच जैशकडूनही अशा प्रकारची कारवाई केली जाऊ शकते. तर देशांतर्गत बंडखोर गट जसे शीख बंडखोर, डाव्या जहाल संघटना आणि ईशान्येकडील बंडखोर गटांकडूनही अशा प्रकारचे हल्ले घडवून आणले जाऊ शकतात असं गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्यानं माध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: तुरुंगवास टळला… पण दोष माफ नाही! माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात हायकोर्टाचा असा निर्णय की राजकारण हादरलं

मोठी बातमी! आगामी भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला मिळणार नाही एकही शिक्षक; ‘हे’ आहे कारण, डिसेंबरअखेर अंतिम होणार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची संचमान्यता

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी मिळणार ४५०० रुपये; नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार, वाचा...

आजचे राशिभविष्य - 20 डिसेंबर 2025

Weekend Special Breakfast : वीकेंडला सकाळी नाश्त्यात बनवा खास पदार्थ, सर्वजण करतील कौतुक

SCROLL FOR NEXT