देश

Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साह! यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या खास गोष्टी

आज देश आपला अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज देश आपला अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या या खास गोष्टी असणार आहेत. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम 'एक भारत, श्रेष्ठ भारत' आहे.

प्रथमच 21 तोफांची सलामी

देशात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध कार्यक्रमांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची घोषणा केली असून देशवासियांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच स्वदेशी तोफेच्या सहाय्याने 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर उत्साह, प्रभात फेरी निघणार

देशात आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने देशभरात उत्साह आहे. राज्यातील त्या-त्या राजधानीच्या ठिकाणी संबंधित मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडणार आहे. तर देशाच्या विविध ठिकाणी आज विद्यार्थी आणि तरुणांकडून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

14 देशांतील एनसीसी कॅडेटही सहभागी होणार

यंदा 14 देशांतील निवडक NCC कॅडेट समारंभात सहभागी होणार आहेत. या वर्षी लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात 14 देशांतील सुमारे 126 तरुण कॅडेट्स सहभागी होणार आहेत. मॉरिशस, अर्जेंटिना, ब्राझील, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड, अमेरिका, मालदीव, नायजेरिया, फिजी, इंडोनेशिया, सेशेल्स आणि मोझांबिक या देशांचे कॅडेट भारतात पोहोचले आहेत. या परदेशी कॅडेट्सने आपापल्या देशात आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेतला असून त्यात निवड झाल्यानंतर हे एनसीसी कॅडेट्स भारतात आले आहेत. कॅडेट कल्चर एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधण्यासाठी भारतात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT