Madam Bhikaji Cama Sakal
देश

Independence Day 2023: या महिलेने स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच परदेशात फडकावला होता तिरंगा; जाणून घ्या...

जाणून घ्या परदेशात भारताचा झेंडा फडकवणाऱ्या या भारतीय महिला क्रांतिकारकाबद्दल.

वैष्णवी कारंजकर

ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीतून खडतर संघर्ष आणि आंदोलनं करून अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. दरवर्षी देशवासीय भारताच्या स्वातंत्र्याचा हा उत्सव उत्साहात साजरा करतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात.

शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांसोबतच लोकांच्या घरांमध्ये आणि वसाहतींमध्येही ध्वजारोहण केलं जातं. या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शूर सुपुत्रांचं आणि क्रांतिकारकांचं स्मरण केलं जातं.

ब्रिटीश राजवटीत अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याची मागणी करत भारताचा झेंडा फडकावला होता. पण स्वातंत्र्यापूर्वी परदेशात भारताचा झेंडा फडकवणारी एक भारतीय महिला क्रांतिकारकही होती. जाणून घ्या परदेशात भारताचा झेंडा फडकवणाऱ्या या भारतीय महिला क्रांतिकारकाबद्दल.

परदेशात भारतीय झेंडा फडकावणारी ही महिला म्हणजे भिकाजी कामा. त्यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ रोजी मुंबईत झाला. भिकाजी कामा यांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्तीची भावना होती. प्रत्येक भारतीयाप्रमाणे भिकाजी कामा यांनीही देश स्वतंत्र करण्याचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या आगीत उडी घेतली.

देशभरातील लोक स्वातंत्र्याच्या मागणीसाठी भडकले होते आणि ठिकठिकाणी आंदोलनं आणि सत्याग्रह करत असताना भिकाजी कामा यांनी परदेशातही भारताच्या स्वातंत्र्याची मागणी लावून धरली. १८९६ मध्ये मुंबईत प्लेगची साथ पसरली तेव्हा भिकाजींनी रुग्णांची सेवा सुरू केली. यादरम्यान त्या स्वतः प्लेगच्या विळख्यात सापडल्या. उपचारानंतर बरे झाल्यानंतर त्याही देशसेवेत गुंतल्या.

भिकाजी कामा या भारतीय वंशाच्या पारशी महिला होत्या. त्या काळात त्यांनी लंडन ते जर्मनी आणि अमेरिका असा प्रवास केला. या दरम्यान भारताच्या स्वातंत्र्याच्या बाजूने आवाज अनेक देशांमध्ये पोहोचला. भिकाजी कामा पॅरिसहून 'वंदे मातरम' हे पत्र प्रसिद्ध करायच्या, जे भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय होते.

भिकाजी कामा यांनी २२ ऑगस्ट १९०७ रोजी म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याच्या ४० वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये देशाचा ध्वज फडकवला होता. जर्मनीच्या स्टुटगार्ट शहरात झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये त्यांनी भारतीय ध्वज फडकवून स्वातंत्र्य लढ्याची मागणी तीव्र केली. डोळ्यात स्वातंत्र्याचं स्वप्न घेऊन १३ ऑगस्ट १९३६ रोजी भिकाजी कामा यांनी या जगाचा निरोप घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेची प्रभाग रचना आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला

Pune News : पूर्ण व्यवहार रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार; आचार्य गुप्तीनंदीजी महाराज यांचा इशारा

Lightning Strike : गेवराईत वीज पडल्याने दोन शेतमजूर महिला जखमी

Electricity Shock : एमआयडीसीत सेल्को एक्स्ट्रुजन कंपनीत विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Shreyas Iyer बरा होतोय...! ICU मधून बाहेर, वाचा काय आहेत नवे अपडेट्स

SCROLL FOR NEXT