Indresh Kumar, Mahatma Gandhi:  
देश

Independence Day: 'बापूंच्या चुकीने देशाचे तुकडे; RSS नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शनिवारी जयपूरमध्ये एका कार्यक्रमात इंद्रेश कुमार म्हणाले की, 75 वर्षांपूर्वी भारताला फाळणीच्या रूपाने स्वातंत्र्य मिळाले. ते म्हणाले की, त्यावेळी बापू (महात्मा गांधी) नेहरू (जवाहरलाल नेहरू) आणि जिना यांची ब्रिटिशांशी चर्चेसाठी एडीसी म्हणून निवड केली नसती तर भारताची फाळणी झाली नसती. (Mahatma Gandhi news in Marathi)

इंद्रेश कुमार म्हणाले की, जर बापूंनी सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांची एडीसी म्हणून निवड केली असती तर भारताची फाळणी झाली नसती. बापूंच्या छोट्याशा चुकीने भारताचे तुकडे झाले. याआधीही इंद्रेश कुमार आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी हर घर तिरंगा मोहिमेवरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

तत्पूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील आरएसएसवर कडाडून टीका केली होती. कर्नाटक खादी ग्रामोद्योगच्या भेटीची काही छायाचित्रे शेअर करून राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला होता. आरएसएसने ५२ वर्षांत तिरंगा फडकावला नाही, नाही, असा दावा राहुल यांनी केला होता. त्यालाही इंद्रेश कुमार प्रत्युत्तर दिलं.

इंद्रेश कुमार म्हणाले की, काँग्रेस आणि इतर विरोधी नेते आधी आपल्या माननीय राष्ट्रपतींचा अपमान करतात आणि नंतर हर घर तिरंगा मोहिमेत समील होण्याचं टाळून तिरंग्याचा अपमान करतात. तसेच ते आरएसएसला शिव्या घालणे फॅशन समजतात, असंही कुमार यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT