Independence Day  esakal
देश

Independence Day : डॉलर ४ रुपये , २० रुपये सायकल अन् पेट्रोल २५ पैसे... सन १९४७ च्या किंमती ऐकल्या तर चकीत व्हाल

स्वातंत्र्यानंतर महागाई फार वाढली अन् रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत फार घसरली.

धनश्री भावसार-बगाडे

Inflation After Independence Of Country In Marathi :

आज ७७ वा स्वातंत्र्य दिवस आहे. आज देशाला ७६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या ७६ वर्षांत खूप काही बदलले आहे. ज्या गोष्टी तेव्हा काही पैशांमध्ये मिळत असत त्या आता शंभर रुपयांच्याही वर पोहचल्या आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की, महागाई किती वाढली आहे.

तुम्ही तुमच्या घरातल्या ज्येष्ठांना बोलताना ऐकलं असेल की, त्यांच्या काळात १ रुपयात भरपूर तूप आणि शंभर रुपयांत सोन्याचे दागिने मिळत असत. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार हे खरं आहे कारण आजच्या तुलनेत तेव्हा किंमती फारच कमी होत्या. जाणून घेऊया सविस्तर.

१ डॉलरला लागत होते ४ रुपये

स्वातंत्र्याच्या काळात १९४७ मध्ये एक डॉलरची किंमत ४ रुपयांपेक्षा कमी होती. आज एक डॉलर ८३ रुपयांचा झाला आहे. स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षी भारतीय रुपयाची किंमत साधारण २० पट घसरली आहे. अवमूल्यन, व्यापार असमतोल, अर्थसंकल्पीय तूट, महागाई, जागतिक इंधनाच्या किमती, आर्थिक संकट इत्यादी कारणांमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन सातत्याने होत आहे.

६६५ पटीन वाढलाय सोन्याचा दर

स्वातंत्र्यानंतर सोन्याची किंमत ६६५ पटीने वाढली आहे. जर तुम्ही त्यावेळी सोनं खरेदी केलेलं असते तर आज तुम्ही मालामाल झाले असता. स्वातंत्र्यानंतर सोन्याचा दर ८८.६२ रुपये प्रति तोळा होता. तर आज एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव ५९००० रुपये प्रति तोळ्याजवळ ट्रेड करत आहे. अशा प्रकारे सोने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ६६,४७५ टक्क्यांनी रिटर्न दिले आहे.

वस्तूंचा १९४७ अन् २०२३ वर्षांतील किंमतीची तुलना

सोने - १९४७ मध्ये ८८ रुपये प्रति तोळा - २०२३ मध्ये ५९,००० रुपये प्रति तोळा.

पेट्रोल - १९४७ मध्ये २५ पैसे प्रति लीटर - २०२३ मध्ये १०५ रुपये प्रति लीटर

तांदुळ - १९४७ मध्ये १२ पैसे प्रति किलो - २०२३ मध्ये ९७ रुपये प्रति किलो

बटाटा - १९४७ मध्ये २५ पैसे प्रति किलो - २०२३ मध्ये ३० रुपये प्रति किलो

सायकल - १९४७ मध्ये २० रुपये - २०२३ मध्ये ८००० रुपये

विमान भाडे (दिल्ली ते मुंबई) - १९४७ मध्ये १४० रुपये - २०२३ मध्ये सुमारे ७००० रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena–AIMIM Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिनसेनेची देखील AIMIM सोबत युती

बंडखोरी भोवली! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या आदेशानंतर मालेगावात भाजपकडून दोन माजी महापौरांची पक्षातून हकालपट्टी

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये वाळू व्यावसायिकांवर ईडीची धाड

लोकशाहीची सुरवात पाश्चात्य देशात नाही तर भारतातील 'या' राज्यात झाली! CM योगी आदित्यनाथांनी दिले पुराव्यांसह उत्तर

Farmer Success Story: अंकितची केळी गेली साता समुद्रापार; युवा शेतकऱ्याच्या श्रमाला मिळाल फळ, अडीच एकरात लाखांचे उत्पन्न..

SCROLL FOR NEXT