Narendra Modi on Red Fort Sakal
देश

Independence Day: "लाल किल्ल्यावरुन PM मोदींचं शेवटचं भाषण असेल"; ममता बॅनर्जींचं भाकीत

उद्या १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत. पण मोदींचं पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरुन केलं जाणार भाषण हे शेवटचं भाषण असेल असं भाकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. (Independence Day speech by PM Modi will be his last from ramparts of Red Fort says Mamata Banerjee)

कोलकाताच्या बेहाला इथं बोलताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय निशाणा बनवलं. यंदाचं त्यांचं लाल किल्ल्यावरुन होणारं स्वातंत्र्यदिनाचं देशाला उद्देशून भाषण हे शेवटचं भाषण असेल असं त्यांनी म्हटलं.

म्हणजेच पुढील वर्षी साजरा होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील, असं त्यांना म्हणायचं आहे. स्वांतत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी राजकीय विधान केल्यानं त्यांना भाजपच्या गोटातून जोरदार टीकेला समोरं जावं लागू शकतं. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, सध्या देशभरात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहायला लागलं आहे. यापार्श्वभूमीवर भाजपप्रणित एनडीए अॅक्टिव्ह झाली आहे. तर दुसरीकडं भाजपविरोधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन झाली असून या आघाडीच्या कामकाजानं वेग घेतला आहे.

या दोन्ही युती आणि आघाडीकडून एकमेकांविरोधात डावपेच खेळायला सुरुवात झाली आहे. कसंही करुन भाजपला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखायचं हा चंगच 'इंडिया' आघाडीनं बांधला आहे. (Latest Marathi News)

मोदी उद्या काय बोलणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत. सरकारी झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांचं भाषण सुरु होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे भाषण होणार असल्यानं ते जास्त प्रमाणात प्रचारकी भाषणही असू शकेल.

तसेच केंद्रानं गेल्या ९ वर्षात आणलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती ते देतील. देशाच्या भविष्याचं व्हिजनही ते मांडू शकतील. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना इंडिया आघाडीवरही त्यांचा प्रहार होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT