सैनिकी शाळा Sakal
देश

देशात सुरु होणार २१ नव्या सैनिकी शाळा; संरक्षण मंत्रालयाची परवानगी

राज्यातील विखे पाटील शाळेचा यामध्ये समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संरक्षण मंत्रालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता देशात २१ नव्या सैनिकी शाळांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नगर येथील पी. डी. डॉ.विखे पाटील सैनिक शाळेचाही समावेश आहे.

स्वयंसेवी अथवा खासगी संस्था तसेच राज्य सरकार यांच्यासोबत भागीदारीच्या माध्यमातून सैनिकी शाळा सुरू होणार आहेत. देशभरात अशा १०० सैनिकी शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्याचाच भाग म्हणून या नव्या शाळांना परवानगी देण्यात आली आहे. या शाळा सध्या अस्तित्वात असलेल्या सैनिकी शाळांपेक्षा वेगळ्या असतील. सध्याच्या सैनिकी शाळा पूर्णपणे निवासी शाळा आहेत. मात्र, या नव्या शाळांपैकी सात शाळा दिवसभराच्या असतील तर, १४ शाळा निवासी शाळा असतील. त्यांच्या संबंधित शैक्षणिक बोर्डाशी संलग्न असतील, तसेच सैनिक स्कूल सोसायटीच्या आधीन राहून त्यांचे काम सुरू असेल. या सोसायटीने भागीदारीतल्या सैनिकी शाळांसाठी निश्चित केलेल्या नियम-कायद्यांच्या अनुसार त्यांचे कार्यान्वयन चालेल.

मान्यता मिळालेल्या नव्या सैनिकी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया मे महिन्यापासून पासून सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसऱ्या फेरीत उर्वरित सैनिकी शाळांसाठी इच्छुक असल्याचे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे.

अशी असेल प्रवेश प्रक्रिया :

- इयत्ता सहावीपासून मिळणार प्रवेश

- नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहावीच्या वर्गात ४० टक्के जागा राखीव असतील

- त्याच शाळेत आधी शिकत असलेल्या आणि आता सैनिकी शाळेत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ६० टक्क्यांपर्यंतच्या जागा ठेवल्या जातील.

- मात्र, त्यांनाही एक पात्रता परीक्षा द्यावी लागेल

- अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा-२०२२ साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी वर माहिती दिली जाईल.

- पात्र विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या शाळेत प्रवेश घेण्याकरिता ई-कौन्सिलिंगसाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.

- ज्या विद्यार्थ्यांनी नव्या सैनिकी शाळांमध्ये आधीच नोंदणी केली, त्यांना पात्रता परीक्षेच्या आधारावर प्रवेश दिले जाणार

प्रवेश आणि इतर माहितीसाठी : www.sainikschool.ncog.gov.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठे पेट्रोल १०१ रुपये, तर कुठे ११६ पार! तुमच्या शहराचा दर किती? कच्च्या तेलाचे दर घसरले, तरी पेट्रोल स्वस्त का नाही?

Sangli Milk Rate : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात दूध महागणार; विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपये, तर दूध उत्पादकांना मिळणाऱ्या खरेदी दरात ३ रुपयांची वाढ

Bhandardara Dam: भंडारदरा, निळवंडेतून आवर्तन ;पालकमंत्र्यांचे निर्देश; नदीकाठच्या गावांना दिलासा

IND vs NZ 5th ODI Live: रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीही स्वस्तात बाद; पॉवरप्लेमध्येच भारताने गमावल्या ३ विकेट्स

Pandharpur News: पंढरपूर कॉरिडॉरसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू,६०२ पैकी ९० मालमत्ताधारकांनी दिली संमती; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

SCROLL FOR NEXT