Narendra modi and Lalu Prasad Yadav 
देश

India Alliance Update: 'हम भी झांसे मे आ गए ओर...'; 15 लाख देण्याच्या 'त्या' आश्वासनावर लालूंचा मोदींना टोला

रवींद्र देशमुख

Mumbai News - मुंबईत विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची तिसरी दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा झाली. तसेच अनेक समित्या देखील स्थापन करण्यात आल्यात आहेत. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

लालू यादव म्हणाले की, याआधी विरोधक विभागल्यामुळे मोदी सरकारचा विजय झाला. या देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. देशात गरिबी वाढत आहे, महागाई वाढत आहे. 60 रुपये किलो भेंडी झाली आहे. टोमॅटोचं तुम्हाला तर माहिती आहे. मात्र आम्ही लढाई लढत आहोत. पटना, बंगलोर आता मुंबईतील बैठकीनंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की समिती तयार करण्यात आल्या आहेत. हे लोक खोटं बोलून सत्तेत आल्याचं लालू यांनी नमूद केलं.

मोदींनी सांगितलं होतं की, भारताचा पैसा स्वीस बँकेत पैसा जमा आहे. आम्ही सत्तेत आल्यावर स्विस बँकेतील पैसा भारतात आणून सगळ्यांना 15 लाख देणार आहोत. 'हम भी मोदींजी के झांसे मे आ गये...'. आम्ही पण बँकेत खाते उघडलं. माझ्या कुटुंबातील ११ जणांना बँकेत खाते उघडले. देशातील सर्वांनी खाते उघडलं. पण अद्याप एकही पैसा आलेला नाही, असा टोला लालू यांनी मोदींना लगावला.

चांद्रयान मोहिमेच्या यशावर बोलताना लालू म्हणाले की, चांद्रयान मोहिमेच्या यशासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा गौरव व्हायला हवा. त्याचवेळी आम्ही इस्त्रोला अपील करतो की, मोदींना चंद्रावर नव्हे तर सूर्यावर पाठवा.

लालू पुढं म्हणाले की, सध्या सगळ्या नेत्यांना ईडी-सीबीआयच्या नोटीस येत आहेत. पण आम्ही घाबरणारे नाहीत. माझं किडनी ट्रान्सप्लांट केलं. माझ्या मुलीने मला तिची किडनी दिली. सहा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र आम्हाला विश्वास आहे की आम्ही येथे राहून मोदीला हटवल्याशिवाय थांबणार नाही, असं आव्हानही लालू यांनी मोदी सरकारला दिलं.

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT