देश

INDIA : ''इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी नितीश कुमारांच्या नावाची घोषणा होणार'', मोठ्या नेत्याचा दावा

संतोष कानडे

नवी दिल्लीः इंडिया आघाडीकडून अद्याप पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाहीये. नितीश कुमार यांचंही नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत असतं. परंतु आता एका मोठ्या नेत्याने त्यांचं नाव जाहीर होणार असल्याचं म्हटलं आहे.

जनता दल युनायटेड पक्षाच्या मोठ्या नेत्याने दावा केलाय की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान पदासाठी आवश्यक असणारे सगळे गुण आहेत. जेव्हा इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाची घोषणा होईल तेव्हा ते नितीश कुमार यांचंच नाव असेल असं माहेश्वर हजारी यांनी म्हटलं आहे.

माहेश्वर हजारी हे बिहार विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या विधानामुळे इंडिया आघाडीत बिघाडी होणार की खरंच नितीश कुमार यांचं नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

माहेश्वर हजारी पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक गुण आहेत. त्याच्यापेक्षा वरचढ नेता इंडिया आघाडीमध्ये नाही. त्यामुळे पंतप्रधान पदाचं नाव जाहीर होईल तेव्हा ते नितीश कुमार यांचंच असेल.

जेडीयूच्या सर्व आघाड्यांची बैठक नितीश कुमार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली, त्यानंतर हजारी यांनी हे विधान केलं.

''नितीश कुमार हे देशातले सर्वात मोठे समाजवादी नेते आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटलं होतं की, राम मनोहर लोहिया आणि जेपी यांच्यानंतर नितीश कुमार मोठे समाजवादी नेते आहेत. ते पाच वर्षे भारत सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत आणि १८ वर्षे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यापेक्षा योग्यता असलेला दुसरा नेता नाही'' असं माहेश्वरी म्हणाले.

इंडिया आघाडीची एकजुट खऱ्या अर्थाने नितीश कुमार यांनी केली. त्यामुळे आज नाही तर उद्या त्यांच्या उमेदवारीची घोषणा इंडिया आघाडीकडून झाल्याशिवाय राहणार नाही, अशी पुष्टी माहेश्वर हजारी यांनी दिली. 'आज तक'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT