India and Russia sakal
देश

India and Russia : प्रादेशिक स्थैर्यासाठी परस्परांना साहाय्य

भारत आणि रशिया शांतता व प्रादेशिक स्थैर्यासाठी परस्परांना साहाय्य करणारी भूमिका पार पाडण्यासाठी उत्सुक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारत आणि रशिया शांतता व प्रादेशिक स्थैर्यासाठी परस्परांना साहाय्य करणारी भूमिका पार पाडण्यासाठी उत्सुक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्याला निघण्यापूर्वी औपचारिक निवेदन देताना पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेतच्या भेटीदरम्यान द्वीपक्षीय सहकार्याचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढील तीन दिवसांच्या कालावधीत पंतप्रधान मोदी रशिया आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या प्रमुखांशी द्वीपक्षीय सहकार्याबद्दल चर्चा करणार आहेत. मोदींनी या निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी गेल्या दहा वर्षांत लक्षणीयरित्या वाढली आहे.

त्यात ऊर्जा, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आणि जनतेचा थेट संपर्क या क्षेत्रांचा समावेश आहे. ‘‘या दौऱ्यात माझे मित्र व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्वीपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यासाठी आणि विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार व्यक्त करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. शांतता आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी साहाय्य करण्याची भूमिका दोन्ही देशांना बजावायची आहे. या भेटीमुळे मला रशियातील भारतीय समुदायाला भेटण्याचीही संधी मिळेल’’, असेही या निवेदनात म्हटले आहे.

रशियातील भारतीयांच्या मागण्या

रशिया दौऱ्यावर आलेले पंतप्रधानांकडे येथे राहणाऱ्या भारतीयांच्याही काही मागण्या आहेत. रशियामध्ये मंदिर उभारणीसाठी प्रयत्न सुरू असून या प्रयत्नांना बळ द्यावे, अशी इच्छा आहे. आयुर्वेदिक औषधांना रशियामध्ये परवानगी मिळावी, अशीही डॉक्टरांची मागणी आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel News: पनवेलच्या कळंबोली गेट पंप प्रकल्पावरून नवा वाद, ठाकरे गटाच्या नगरसेविका आक्रमक

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानला चौथा धक्का; अक्षर पटेलने बाबर आझमला केलं 'क्लिन बोल्ड'

Pune Crime : कल्याणीनगरमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात; एक ठार, १७ जण जखमी

Pune Crime : महापालिका भवनजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लंपास

SCROLL FOR NEXT