India GDP Crosses 4 trillion dollar mark eSakal
देश

India GDP : भारताच्या अर्थव्यवस्थेची मोठी झेप! पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला जीडीपी - रिपोर्ट

4 trillion Dollars : यामुळे भारत देश आता 333 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था झाला आहे.

Sudesh

India GDP Crosses 4 trillion dollar mark : भारत देशाच्या अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली आहे. देशाचा GDP हा पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. यामुळे भारत देश आता 333 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था झाला आहे. एशियानेट वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

भारताची अर्थव्यवस्था अगदी वेगाने पुढे जात असल्याचा हा पुरावा आहे. यापूर्वी मोदी सरकारने भारत 2024-25 या वर्षापर्यंत 4 ट्रिलियन डॉलर्सचा पल्ला गाठेल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आता 2024 हे वर्ष सुरू होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेने हा टप्पा गाठला आहे.

सध्या ग्लोबल जीडीपीच्या यादीमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ चीन, जपान आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. भारताने या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेत, युनायटेड किंगडमला मागे टाकलं आहे. विकासाची गती पाहता, पुढील तीन वर्षांमध्ये भारत जर्मनी आणि जपानलाही मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकतो; असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT