Congress and Mamta Benerjee 
देश

India Bloc Mamata Banerjee: इंडिया आघाडीला 'अच्छे दिन'! दिल्ली, गुजरात, युपीनंतर आता ममतांसोबत काँग्रेसची जागा वाटपावर चर्चा

पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी एकला चलोचा नारा दिलेल्या ममता बॅनर्जी पुन्हा काँग्रेससोबत चर्चेला तयार झाल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मोदी सरकारला पर्याय म्हणून विरोधकांची इंडिया आघाडी असा जो प्रयोग करण्यात आला आहे. पण तो फसल्याची स्थिती काही दिवसांपूर्वी निर्माण झाली होती. पण आता हीच इंडिया आघाडी पुन्हा एकदा ताकदवान होत असल्याची परिस्थिती तयार होत आहे.

कारण देशातील चार राज्यांमध्ये काँग्रेसनं जागा वाटपावर यशस्वी तोडगा काढला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी एकला चलोचा नारा दिलेल्या ममता बॅनर्जी पुन्हा काँग्रेससोबत चर्चेला तयार झाल्याचं वृत्त आहे. (india bloc gaining strength after delhi gujarat goa and up congress begins seat sharing talks with mamata banerjee In bengal Report)

काँग्रेस-तृणमूलमध्ये इतर तीन राज्यांत जागांबाबत चर्चा

विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी काँग्रेसला चार जागा तर उर्वरित जागा तृणमूल काँग्रेस लढवण्यावर सहमती होत असल्याची माहिती आहे. तर मेघालय आणि आसाममध्ये तृणमूल काँग्रेस प्रत्येक एक जागा लढवणार आहे. (Marathi Tajya Batmya)

पण दोन्ही पक्षांमध्ये मेघालयातील तुरा या लोकसभेच्या जागेवरुन सध्या चर्चा अडकली आहे. ही जागा तृणमूलला देण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचं सांगितलं जात आहे. पण याच तुरा जागेवार २०१९ च्या निवडणूक काँग्रेसचा वोट शेअर ९ टक्के, भाजपचं १३ टक्के, तृणमूलचं २८ टक्के तर एमएमपीचं ४० टक्के इतकं होतं. त्यामुळं या जागेवर तृणमूलनं दावा केला आहे.

बंगालमध्ये एकला चलोचा नारा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जानेवारी महिन्यात घोषणा केली होती की, आगामी लोकसभा निवडणूक तृणमूल काँग्रेस एकट्यानं लढवणार आहे. यामुळं इंडिया आघाडीला मोठा झटका बसला होता. राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय' यात्रा पश्चिम बंगलमध्ये प्रवेश करणार होती यापार्श्वभूमीवर ममतांनी एकला चलोची घोषणा केली होती. त्यावेळी चर्चाही अशी होती की तृणमूल काँग्रेसनं काँग्रेसला २ जागांचा प्रस्ताव दिलो हाता पण काँग्रेसनं तो धुडकावून लावला होता. (Latest Marathi News)

दिल्लीत आपसोबत, उत्तर प्रदेशात सपासोबत काँग्रेसची युती

दरम्यान, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीसोबत काँग्रेसची युती झाली असून उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसोबत जागा वाटपावर चर्चा सुरु झाली आहे. युपीमध्ये काँग्रेस १७ जागांवर लढणार आहे, तर इतर ६३ जागाांवर सपासह इंडिया आघाडीतील इतर उमेदवार लढणार आहेत. युपीमध्ये काँग्रेस ज्या जागा लढणार आहे त्यात रायबरेली, अमेठी या खुद्द गांधी परिवाराच्या पारंपारिक मतदारसंघासह इतर जागांवर लढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT